![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ तुषार कमल पशिने
तिरोडा:- तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रात सिंचन विकासाबरोबरच नागरी क्षेत्राचा विकास करण्यासाठी आमदार विजय रहांगडाले हे नेहमी शासनाकडे निधीची मागणी करून निधी खेचून आणण्यास अग्रेसर असून तिरोडा शहरातील रस्ते व सौदरीकरण करण्याकरिता शहरातील रस्ते बांधकामाकरिता महाराष्ट्र शासनाच्या नगर र्विकास विभागामार्फत ४.०० कोटी विकासकामांचे भूमिपूजन आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते संपन्न झाले आहे भूमिपूजन कार्यक्रमाला प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जितेंद्र रहांगडाले, भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, भाजप शहरअध्यक्ष स्वानंद पारधी , मा.नगराध्यक्षा सोनाली देशपांडे, मजूर सहकारी संस्था सचिव उमाकांत हारोडे, जिल्हा महामंत्री राजेश मलघाटे, भाजयुमो शहराध्यक्ष अमोल तीतीरमारे, उपाध्यक्ष मकरम लिल्हारे, महामंत्री दिगम्बर ढोक,प्रकाश सोनकावडे, सोशल मिडिया प्रमुख नितीन पराते, किसान आघाडी शहरअध्यक्ष नितीन पारधी, कृउबास संचालक घनश्याम पारधी, मा. न.प.सदस्य अशोक असाटी, श्वेता मानकर, शीतल तिवडे, देवदत्त देशपांडे,वासू कनोजे, सोनाली सोनकावडे व नगरातील कार्यकर्ते उपस्थित होते.