![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
फुक्कीमेटा/ कन्हैया क्षीरसागर
ग्रा.पं.अंतर्गत अतिगरजू व्यक्तीची शासनाला आर्त हाक..
शासनाने संपुर्ण गरीब गरजू नागरिकांना पक्के घर मीळनार आहेत असे म्हणुन,संपूर्ण भारतामध्ये आश्वासन दिले. परंतु आतापर्यंत जे गरीब ,अतीगरजु आहेत, त्याना या घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. असे चीत्र ग्रामीण भागामध्ये पाहण्यास मिळालेले आहे. निवडनुका जवळ आल्या की, सगळे नेते गरीब गरजुना आपुलकीसाठी आश्वासन देतात. पन पुर्ण करून घेत नाही . असचे 2019 च्या चुनावामध्ये पाहण्यास मिळाले . सत्ताधारी पक्षानी केंद्र व राज्या मध्ये सत्ता असतानी पंतप्रधान यांनी 2022 पर्यत सगळ्याना पक्के घर देण्याकरीता ग्रामीण व शहरी भागामध्ये आश्वासन दिला . परंतु काही कारणास्तव 2022 पर्यंत संपूर्ण घरकुल सगळ्या नागरिकापर्यंत पोहोचू शकले नाही त्यामुळे आणखी दोन वर्षाची मुदत दिली आहे.
अशीच घटना देवरी तालुक्यातील फुक्कीमेटा ग्रामपंचायत अंतर्गत सुरेंद्र येरपुडे नामक व्यक्तीची आहे.या व्यक्तीचे ड क्रमांकाच्या घरकुल यादी मध्ये नाव असून सुद्धा, अजून पर्यंत या व्यक्तीला शासनाच्या घरकुल योजनेचे आतापर्यंत कोणतेही लाभ मिळालेले नाही. ही व्यक्ती फुक्किमेटा ग्रामपंचायत येथील जन्मापासून रहिवासी असून, या व्यक्तीचे कौलारू मातीचे जुनेच घर आहे. यंदा पावसाळ्याची सुरुवात झालेली असून, पावसाळ्याच्या पाण्यामुळे या व्यक्तीचे सद्या वास्तव्याचे घर पूर्णतः जमीन दोस्त झाला आहे. त्यामुळे या व्यक्तीला राहण्यासाठी घराची व्यवस्था नसल्यामुळे याच्या कुटुंबाला उघड्यावर येण्याची वेळ आली आहे. जर शासनाने या व्यक्तीच्या कुटुंबाला घरकुल योजनेचा लाभ दिला असता तर, आज या व्यक्तीच्या कुटुंबाला उघड्यावर राहण्याची वेळ आली नसती. सुरेंद्र येरपुडे या व्यक्तीच्या कुटुंबा सारखे असे कित्येक तरी व्यक्तीचे कुटुंब उघड्यावर येण्याची वेळ आली आहे.कितीतरी गरीब -गरजु या योजनेपासुन वंचीत आहे . अश्या अति गरजू जनसामान्याच्या कल्याणासाठी शासनाला जाग केव्हा? येनार. असा प्रश्न नागरिकांमध्ये पडला आहे.आतापर्यत गरजु कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळालेलाच नाही. असे कितीतरी कुटुंब प्रत्येक क्षेत्रामध्ये पाहायला मिळत आहे. शासनाच्या या दिरंगाईमुळे ग्रामीण भागामध्ये चींतेचे वातावरण आहे.
सुरेंद्र येरपुडे(स्थानिक नागरिक फुक्किमेटा)* = माझा (ड )यादी मध्ये नाव असुन सुद्धा शासनाने म्हणल्या प्रमाने 2022 जाउन 2023 आला. अजुनही मला मझ्या हक्काचे घर दिलेले नाही. माझा घर पडक्या अवस्थेमध्ये असून पावसाचे दिवस आले . जर माझा घर जमीनदोस्त झाला व जिवितहानी झाली तर याचा जवाबदार कोण ? मला व माझ्या परिवाराला भर पावसात उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.