![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
कृषी पंपाची वीज दिवसा बारा तास दया -माजी आमदार चरण वाघमारे
भंडारा- खरीप हंगामातील धान पिकांची लागवड करताना पावसाच्या अभावी रोवणी करणे शक्य नाही त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज देण्याची मागणी माजी आमदार चरण वाघमारे यांनी राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
भंडारा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील धान्याचा कोठार म्हणून संबोधल्या जात असतांनाच जिल्ह्यातील शेतकरी मोठया प्रमाणात धान पिकाची लागवड करीत असतात. खरीप हंगाम सुरू झाला असला तरी पावसाच्या अभावी धान पिकांची लागवड करणे शक्य नाही. म्हणजेच शेतकरी अस्मानी संकटाचा सामना करीत असतांना राज्य सरकार सुध्दा शेतकऱ्यांप्रती उदासीन असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.एकेकाळी राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात असतांना विद्यमान उपमुख्यमंत्री,व तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी आंदोलन उभे करून जणूकाही शेतकऱ्यां हितेशी असल्याचे भासविण्यात आले. पण आता महाविकास आघाडी सरकार नसुन महायुतीची सरकार आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असुन उर्जामंत्रालय त्यांचेच अखत्यारीत असुन त्यातही भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सरकारची जबाबदारी पार पाडत आहे. अशी सर्व सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या कडे असूनही दिवसा विजेची मागणी करणारे देवेंद्र फडणवीस आता मात्र शेतकरी हितासाठी दिवसा वीज पुरवठा करण्याचा धोरण निश्चित करणे अपेक्षित आहे. विजेच्या रात्रपाळीच्या शेड्युल मुळे रात्र पाळीत जंगली जनावरे, साप, विंचू अशा विषारी जीवजंतूंच्या धाकाने शेतकर्यांनी जीव धोक्यात घालून रात्री उशिरा शेतावर जाणे शक्य नाही.त्यामुळे वीजेच्या अभावी धान पिकांची लागवड होऊ शकत नाही.परिणामी शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा मार्ग अवलंबन्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नाही.
त्यामुळेच राज्य सरकारने विशेषकरून राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकरी हिताचे असल्यास कोणतेही कारण उपस्थित न करता शेतकऱ्यांचा हीत लक्षात घेऊन दिवसपाळीत किमान बारा तास उच्च दर्जाची वीज पुरवठा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय तात्काळ घ्यावा अशी मागणीवजा खुले आव्हान भारत राष्ट्र समितीचे नेते माजी आमदार चरण वाघमारे यांनी प्रसिद्धी माध्यमातून केली आहे.