![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
भंडारा जिल्हा प्रतिनिधी/ जीवन वनवे
तुमसर तालुका येथील बाम्हणी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम
दि.२७ जुलै २०२३ रोज गुरुवार ला छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान तुमसर, शाखा बाम्हनी येथे सामाजिक वनीकरण विभाग तुमसर यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी आपले सामाजीक दायित्व समजून या वृक्षारोपण कार्यक्रमात हिरिरीने सहभाग देत वृक्षारोपण केले. छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान तुमसर, शाखा, बाम्हनी च्या सर्व मावळ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक गावकर्यांनी करत प्रतिसाद दिला हे विशेष. या वेळी सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्र अधिकारी नीतीश धनविजय सर, वनपाल उदगिरकर, छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान, तुमसर चे संस्थापक/अध्यक्ष इंजि.नितिन धांडे, नितिन सार्वे,मनोज बोपचे, गीतेश गणोरकर, कु.साक्षी चन्ने, कु.दीपाली मते व छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान, तुमसर शाखा बाम्हनी अध्यक्ष विक्की भोयर, उपाध्यक्ष, कार्टीक बान्द्रे, सचिव सचिन भोयर, शुभम भोयर, अक्षय वाघमारे, किसन मेश्राम,गणेश जमजारे, पूनमचंद कहालकर, योगेश जमजारे, रामभाऊ जमजारे, अनिल कहालकर, माजी सरपंच मोरेश्वरजी हलमारे, कैलाशजी कहालकर,उपसरपंच आशीषजी जमजारे, आशीषजी कहालकर, मीरासे सर मुख्याध्यापक जि. प. बाम्हणी इ. उपस्थित होते.