
गोंदिया जिल्हा प्रतिनिधि/ अविकुमार मेश्राम
अर्जुनी मोर: अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चान्ना कोडका येथील शेतकरी गोविंदा सोमा भोयर यांचा वीज पडून नैसर्गिक अपघाताने आकस्मिक मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच दिनांक ३०/०७/२०२३ रोज रविवार ला जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांनी चान्ना कोडका येथे भोयर परीवाराची सांत्वन भेट घेतली.
मृतकाच्या परिवारात पत्नी, एक मुलगा,सुन,दोन नातवंडं,दोन मुली असा मोठा परिवार आहे.घरचा कर्ता व्यक्ती गेल्याने भोयर परिवारावर एक मोठे संकट आले.या संकटातुन सावरण्यासाठी त्यांना शक्ती मिळो अशी प्रार्थना केली.
मृतकाच्या पत्नीची मानसिक स्थिती व प्रकृती बरी नसल्याने उपाध्यक्ष महोदयांनी उपचारासाठी भोयर कुटुंबीयांना आर्थिक मदत केली.काळाने भोयर कुटुंबाचा मोठा घात केला. यावेळी माजी जि.प.सदस्य रतिराम राणे, गोठणगाव चे सरपंच संजय ईश्वार, सामाजिक कार्यकर्ते दिलीप खोब्रागडे, सुनिल वलथरे, मुकेश भोयर,अनुपाल कापगते, सुखदेव भोयर, घनश्याम भानारकर,निताराम चुलपार, दुर्योधन भोयर व गावकरी उपस्थित होते.





Total Users : 883108
Total views : 6488546
