![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ तुषार कमल पशिने
हिवरा या गावातील शाळा समिती अध्यक्ष व सदस्यांनी जि. प. सदस्या सौ. अनिता रमेश नलगोपुलवार यांना पत्र देऊन हिवरा येथील जि. प. शाळेतील विध्यार्थी आणि शिक्षक यांच्या संदर्भात माहिती दिली. कि जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचा अभाव आहे वर्ग जास्त आणि शिक्षक कमी आहेत त्या मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे आपण जातीने लक्ष द्याल ही विनंती केली.याची दखल घेत सौ. अनिताताई यांनी शिक्षण व आरोग्य सभापती श्री रमेशभाऊ पारधी साहेब यांच्या ही बाब लक्षात आणून दिली.व गेल्या काही दिवसा पासून बंद असलेली हिवरा येथील जि.प. शाळा लवकरात लवकर सुरू करून हिवरा येथील जि. प. शाळेला अतिरिक्त शिक्षक नियुक्त करून देण्यात यावा. या करिता मा .शिक्षण अधिकारी सोनटक्के सर , गट शिक्षण अधिकारी साहेब, मा. सभापती रितेशजी वासनीक, जि.प. सदस्य नरेशजी ईश्वरकर, प.स. सदस्य छायाताई तडस यांनी शिक्षकांसी संवाद साधून तेथे असलेल्या शिक्षणाच्या बाबतीत अडचणी दूर करून असे आश्वासन दिले. व मुलांना नियमीत शिक्षणला सुरुवात करावी असे सांगितले त्यात प्रमुख उपस्थीती शाळा समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा सदस्य, शाळेतील मुख्यधापक व शिक्षक आणि गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.