![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ तुषार कमल पशिने
भंडारा मोहाडी: देऊळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक ते चार वर्ग आहेत व विद्यार्थी संख्या पन्नास च्या आसपास आहे.विद्यार्थी दहा वाजेपासून पाच वाजेपर्यंत शाळेत शिक्षण घेतात.पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत शाळेच्या भिंती ह्या पूर्णपणे जीर्ण अवस्थेत आहेत व छताचे सुद्धा पडपे निघून लोखंडी रॉड दिसू लागले आहेत.अशा दुरवस्था झालेल्या खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसविणे योग्य नाही.पावसाळा सुरू असल्यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना नाकारता येत नाही.अशा प्रकारच्या दुर्घटनेस जबाबदार कोण असेल असा प्रश्न विद्यार्थ्यांचे पालक विचारत आहेत.जिल्हा परिषदेकडे याबाबद सूचना केलेली आहे परंतु अजूनही शाळेच्या नवीन इमारतीचा प्रश्न सुटलेला नाही.विद्यार्थ्यां जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत.त्यामुळे जोपर्यत नवीन शाळेची ईमारत तय्यार होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांची बसण्याची सोय ही दुसऱ्या ठिकाणी करण्यात यावी
अशी मागणी. *रंजित उचिबगले* *अध्यक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेस सोशल मीडिया मोहाडी तालुका* यांनी केले आहे