![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर प्रतिनिधी/ जीवन वनवे
डाक्टर सौरभ कुंभारे च्या प्रयत्नामुळे रुग्णाला मिळाला जिवदान….
तुमसर: कैंसरची शस्त्रक्रिया म्हटल कि ,कैंसरच्या नावानेच पायाची जमीन सरकल्यासारखी होते ,कैसर चा महागडा उपचार व महागडी शस्त्रक्रिया हि सहसा नागपूर शिवाय लहान शहरात होण्याची शक्यता कमी च त्यामुळे रुग्णाला व त्यांच्या नातेवाईकांना उपचारासाठी मोठ्या शहरात तारेवरची कसरतच करावी लागते.अशातच एखाद्या रुग्णाला तुमसर सारख्या लहान शहरात उपचार करण्यासाठी कोणी सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण विश्वास केला तर सर्व काही शक्य होऊ शकते हे तुमसरातील डाक्टर सौरभ कुंभारे,सर्जन यांनी सिध्द करुन दाखवत कैंसरची जटिल शस्त्रक्रिया करून एका महिलेचे प्राण वाचविण्यात यश आले.
साकोली तालुक्यातील खमार जाम्हळी गावातील शकुनी शेंडे नामक महिला रुग्णाला मागील अनेक दिवसापासून तोंडाला खालच्या जबड्याच्या डाव्या बाजूला एक गाठ होती.त्या गाठिचा उपचार साकोली,भंडारा, व नागपुर येथील दवाखान्यात करण्यात आले पण कोणत्याही डॉक्टर नी कैंसर असल्याचे सांगितलं नाही. शेवटि एका रुग्णांकडून नागपूर ला उपचारासाठी गेले असता तुमसर येथील डाक्टर सौरभ कुंभारे यांच्याविषयी माहिती मिळाली व सदर महिलेने तुमसर गाठुन डाक्टर कुंमारे यांना भेटुन तपासणी केली असता ,सर महिलेला कैंसरचे सुक्ष्म लक्षण झाले असल्याचे सांगितले व त्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.सदर महिला रुग्णांने ताबडतोब आपरेशन ची तयारी दाखवत डॉक्टरांना उपचार करायला सांगितलं.
आपरेशन मध्ये जबडा वाचवुन पुर्ण कैसर काढण्यात येवुन तपासणी साठी पाठवण्यात आला,तपासणीत “”साईनाइड लिस्टीक कैंसर “” चे निदान झाले. असा कैंसर तोंडाच्या व चेहऱ्याच्या कैंसर मध्ये शंभर रुग्णापैकि एखाद्याच रुग्णानाला होतो असे सांगितले, तर हा कैंसर लवकरच ईतर अवयव व हाडात ,फुफ्फुसात पसरतो.जर याचे लवकर निदान झाले तर हा कैंसर आपरेशन नंतर बरा होऊ शकतो,टुथ आपरेशन मध्ये तोंडाचे कैंसर काढावेच लागले सोबतच गळ्यापासुन काही भाग साफ करावे लागते.तिथे हा कैसर पसरु शकतो ,सदर रुग्ण महिलेचा कैंसर पुर्णपणे निघाला असुन महिला कैंसरपासुन मुक्त झाली आहे. कैंसर परत होण्याची संभावना कमी आहे.
तुमसर सारख्या छोट्या शहरात अशा प्रकारची जटिल व दुर्मिळ कैंसरची यशस्वी शस्त्रक्रिया पहिल्यांदा च करण्यात आली असल्याने आता तुमसरचे नाव डाक्टर सौरभ कुंभारे यांनी पटलावर आणले असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी डाक्टर चे कौतुक करत आभार मानले आहे.