
तुमसर/ तुषार कमल पशिने
तिरोडा:- तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील रस्ते विकास व बांधकामाकरिता आमदार विजय रहांगडाले यांनी एकूण २२.४६ कि.मी.रस्त्याकरिता १५.५५ कोटी रुपयाचा निधी शासनाकडून मंजूर करवून घेतला आहे त्यामध्ये प्रामुख्याने कु-हाडी तीमेझरी रस्ता एकूण ४.४० कि.मी.रस्ता बांधकामाकरीता एकूण ३ कोटी ३२ लक्ष रुपये, हिरापूर ते पिंडकेपार रस्ता एकूण ३.५० कि.मी.रस्ता बांधकामाकरीता एकूण ३ कोटी २७ लक्ष रुपये, राष्ट्रीय महामार्ग ७५३ ते करटी खुर्द एकूण ६.०० कि.मी.रस्ता बांधकामाकरीता एकूण ३ कोटी २४ लक्ष रुपये, राष्ट्रीय महामार्ग ७५३ ते केसलवाडा एकूण ४.८० कि.मी.रस्ता बांधकामाकरीता एकूण २ कोटी ७३ लक्ष रुपये, राष्ट्रीय महामार्ग ७५३ ते डब्बेटोला एकूण ४.५१ कि.मी.रस्ता बांधकामाकरीता एकूण ३ कोटी ०१ लक्ष रुपये, अशा एकूण २२.४६ कि.मी.रस्ते बांधकाम व रस्ते दर्जोन्नतीकरिता एकूण १५.५५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत यामुळे विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांची अडचण दूर होणार असून रस्त्याचे बांधकाम सुरु होणार आहे.





Total Users : 883102
Total views : 6488540
