



भंडारा जिल्हा प्रतिनिधी/ जीवन वनवे
तुमसर: ची लोकसंख्या वाढली असून जड वाहनासाठी एकच मुख्य मार्ग असल्याने संपूर्ण जड वाहने शहराच्या मध्यभागातून ये – जा करीत असतात. या संपूर्ण जड वाहनावर शहरात प्रवेश बंदी घालण्यात यावी. अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल कडून पोलिसांना निवेदनामार्फत केली आहे.आज विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी तुमसर पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक मा. श्री. निलेश ब्राह्मणे यांना निवेदन दिले .या निवेदनामध्ये पोलीस निरीक्षक श्री. निलेश ब्राह्मणे यांना शहरात होणारी जड वाहतूक ला बंदी घालण्यात यावी तसेच ज्यावेळी सकाळी शाळेच्या वेळेवर विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास होऊ नये याकरिता बावनकर चौक पुराना बस स्टॉप चौकात वाहतूक पोलिसांची ड्युटी लावण्यात यावी. त्याचप्रकारे रस्त्यावर जनावरे बसलेले अवस्थेत असतात .यामुळे अपघात होण्याची भिती आहे. या गोष्टीच्या पाठपुरावा करून रस्त्यावरील जनावरांच्या योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यात यावी. अशा अनेक शहरातील समस्या मार्गी लावावी. असे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रामुख्याने उपस्थित योगेश बुचे, प्रमोद चावटकर ,अर्पित जायस्वाल, अभय मिश्रा, सोनू शर्मा, यश शर्मा, गोविंद फुलवधवा, गोलू धावडे, प्रफुल मिश्रा, जागेश वाघमारे ,योगेश मुळे व विश्व हिंदू परिषद व बजरंग दल संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.