![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
अविकुमार मेश्राम/ गोंदिया जिल्हा प्रतिनिधि
अर्जुनी मोर: समता फाउंडेशन मुंबई आणि शिवप्रसाद . सदानंद जायस्वाल महाविद्यालय अर्जुनी मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत चष्मा वितरण कार्यक्रम दि . 28 जुलै ला सपन्न झाला . 1 जुलै ला झालेल्या मोफत डोळे तपासणी कॅम्प मध्ये 145 नेत्र रुग्णांचे डोळे तपासण्यात आले होते . त्यां पैकी 74 लाभार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते चष्मा वाटप तसेच 45 रुग्णाना आयुष्य मान भारत कार्डाचे वाटप करण्यात आले .श्री दुर्गा शिक्षण संस्था चे अध्यक्ष मा . लूणकरनजी चितलांगे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसेच स्व शिवप्रसाद जी जायस्वाल यांच्या प्रतिमेला माल्यार्पणा ने झाली .
या प्रसंगी मंचावर श्री दुर्गा शिक्षण संस्थे चे अध्यक्ष श्री लुणकरन जी चितलांगे , संस्था सचिव श्री मुकेश जी जायस्वाल , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ईश्वर मोहुर्ले , संस्थां सदस्य डॉ कैलास गाडेकर , आय क्यू ए सी समन्वयक डॉ के जे सीबी आणि समता फाउंडेशन च्या वतीने श्री संतोष मलगाम प्रामुख्याने उपस्थित होते
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी ,पत्रकार , पालक आणि चष्मा लाभार्थी बहुसंख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे संचालन प्रा मोहन धुराटकर यांनी केले आणि डॉ आशिष कावडे यांनी आभार मानले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ लक्ष्मीकांत बोरकर , डॉ मनोज बांगडकर , प्रा पंकज उके तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले