![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
सडक अर्जुनी/ अवि कुमार मेश्राम
सडकअर्जुनी :माणूस हा कलेचा भोक्ता आहे. कला ही जीवनाची एक कौशल्यपूर्ण माध्यम आहे. माणसाला एक तरी छंद असावा कारण मनोरंजनातून माणूस हा स्वतः मधील गूण बाहेर काढतो. म्हणून संगीत जीवनात आवश्यक आहे. म्हणुनच संगीताच्या कलेने जीवनाला घडवा असे प्रतिपादन अर्जूनीमोरगाव क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रीकापूरे यांनी केले. ते संगीत विद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख म्हणून बोलत होते.
यावेळी मंचावर अनिल मुनेश्वर, सेनी मुख्याध्यापक अनिल मेश्राम, आर. व्ही मेश्राम, शिक्षक श्री मेश्राम, शिक्षक परशुरामकर, ढोरे, के ए रंगारी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी संगीत विद्यालयाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. संगीताची देवता किंवा जननी शारदा माताचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी वादक कलावंत, गायक कलावंत, कवी साहित्यिक यांनी आपल्या अंगातील कलेचे प्रदर्शन केले.
आमदार चंद्रीकापूरे पूढे म्हणाले- संगीताची माणसाला गरज आहे. संगीत क्षेत्रात आपला नाव कलावंत म्हणून शास्त्रीय पद्धतीने रोवला पाहिजे. ही आवश्यक आहे.
याप्रसंगी आंबेडकरवादी कवी व साहित्यिक मुन्नाभाई नंदागवळी यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मार्गदर्शन करताना संगीत शिकुन कला जागृत केली पाहिजे. कलेचा उपयोग करून पोटाचा प्रश्न सोडवता येतो, छंद म्हणून सुद्धा आपण कलेकडे पाहीला पाहिजे. आपल्या मातीचा, परिसराचा, गावाचा, विभागाचा, क्षेत्राचा विकास आणि नाव उज्ज्वल केले पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अविनाश मेश्राम यांनी केले, यशस्वीतेसाठी प्रशांत डोंगरे, विपीन चंद्रीकापूरे, पितांबर सूर्यवंशी, अभिषेक यांनी परिश्रम घेतले.