![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ तुषार कमल पशिने
सावधान! युवकांनो निसर्गाशी मुजोरी करू नका! पाण्याशी वैर करू नका!व आगीशी खेळु नका! अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच-पाणी असतांना सेल्फी नादात राज्यात दरवर्षी शेकडो जीव गमावले जातात व यामुळे संपूर्ण परिवार दु:खात डुबतो.सेल्फीच्या जीव घेण्या घटना तलाव, नदी, वॉटर फॉल, धबधबा, समुद्रकीणारी व पहाडी भागात होतांना दिसतात.पर्यटक फिरायला जातात.परंतु निसर्गाशी दुष्मणी(पंगा) घेतात त्यातुनच ह्या जीव घेण्या घटना उदयास येतात. पर्यटकांना धोक्याचे ठिकाण (स्पॉट)माहित असतांना सुध्दा त्याठिकाणी मुद्दाम जाणे व जीव धोक्यात टाकणे ही गंभीर व चिंताजनक बाब आहे.कोणतीही घटना असो थोडीशी चुक मोठी दुर्घटना ओढावीत असते.हीच घटना चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी तलावात घडली आणि चार युवकांना आपला जीव गमवावा लागला. अशा अनेक घटना सेल्फीच्या नादात राज्यासह देशात होतांना आपण पहातो.तरीही लोक नियमांना न जुमानता निसर्गाशी मुजोरी करतात व अशा परिस्थितीत प्राण गमवावे लागते व त्याचे प्रयचित्य संपूर्ण परिवाराला दु:खाच्या स्वरूपात भोगावे लागले. धोकादायक सेल्फीच्या दु:खद घटना कमी न होता दिवसेंदिवस वाढत आहे ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे. विदर्भातील हिंगणा तालुक्यातील प्रसिद्ध मोहगाव (झिल्पी) तलाव पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.परंतु हे दिवसेंदिवस मृत्यूचे ठिकाण ठरतं आहे.कारण या तलावात आतापर्यंत बुडून मृत्यूपावलेल्यांची संख्या १२५ च्या वर असल्याचे सांगितले जाते.नुकताच काही दिवसांपूर्वी या तलावात बुडून ५ तरूणांचा मृत्यू झाला होता.यामुळे पर्यटन स्थळांचा दोष नसुन पर्यटकांच्या चुकांमुळे व अतिरेकामुळे दुर्घटना होतांना दिसतात. सध्याच्या आधुनिक युगात मोबाईल जितका चांगला आहे, त्याच्या शंभर पटीने आजचा युवावर्ग मोबाईलचा चुकीच्या पद्धतीने वापर करीत आहे व त्याचे प्रयचित्य दुर्घटनेच्या स्वरूपात भोगावे लागत आहे.याचे अनेक उदाहरणे आहेत पबजी, ऑनलाईन गेमिंगमुळे, धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलने व दुर्घटना ओढावणे,मोबाईलमध्ये जास्त व्यस्त राहुन परिवारापासुन दुरावने अशा अनेक चिंताजनक घटनांना मोबाईलने नव्याने जन्म दिलेला आहे.त्यामुळे मोबाईलने आजच्या युवकांना धोकादायक स्थितीमध्ये आणुन ठेवले आहे व संपूर्ण हद्दी पार केल्याचे दिसून येते.मोबाईलच्या ऑनलाईन गेमिंगमुळे तर मुलांना ओहरटेक(हायज्याक)करून आपल्या कब्जात केल्याचे दिसून येते.यामुळे अनेक दु:खद घटना आपल्या पहायला मिळतात. मोबाईलचा वापर आपण चांगला केला तर त्यापासून फायदे सुध्दा आहेत.या विपरीत मोबाईलचा दुरूपयोग किंवा चुकीचा वापर केला तर तो महाघातक सुध्दा सिध्द होवून मोठे नुकसान पोहचवितो ही बाब सर्वांनाच ग्यात आहे. घोडाझरी तलावाच्या घटनेचा विचार केला तर ही मुले सेल्फीच्या नादात तलावाजवळ गेलीच नसती तर येवढे मोठे भयावह दुःख ओढवले नसते.त्यामुळे मोबाईलचा आपण चांगला वापर केला तर ठीक आहे अन्यथा त्याचे परिणाम भयानक होवू शकतात याला नाकारता येत नाही.सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत.त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असुन संपूर्ण जिल्हे जलमग्न झाले आहेत.काही नद्या तुडुंब भरलेल्या आहेत, तलाव सुध्दा भरलेले आहेत, राज्यात रस्त्यांना खड्डे पडल्याने त्यात पावसाचे पाणी साचल्याने दुर्घटना ओढावू शकते. जनुकाय निसर्गाने रूद्राअवतार धारण केला की काय असे काही जिल्हात दिसून येते.हवामानाच्या वाढत्या बदलाने निसर्ग केव्हा करवट बदलेल हे सांगता येत नाही.त्यामुळे आपणच सावधगिरी बाळगली पाहिजे अन्यथा अनर्थ होऊ शकतो.त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नदी-नाले, तलाव यापासून स्वतःला सांभाळा “जान है तो जहान है” हा मुलमंत्र सर्वांनीच अंगीकारला पाहिजे.
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.