![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ तुषार कमल पशिने
आज दिनांक 1 जुलै 2023 रोजी तालुका कृषी अधिकारी मोहाडी व पंचायत समिती मोहाडी यांचे संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृह मोहाडी येथे कृषी दिन कार्यक्रम व कृषी संजीवनी सप्ताह समारोप कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक मा.श्री. रितेश वासनिक सभापती पं. स.मोहाडी, यांच्या शुभ हस्ते करण्यात आले असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री बबलूजी मलेवार उपसभापती पंचायत समिती मोहाडी
तसेच प्रमुख उपस्थितीत श्री. शिवाजी मिरासे, तालुका कृषी अधिकारी, मोहाडी, श्री भुजाडे, सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती मोहाडी, श्री भाग्यवान भोयर , विस्तार अधिकारी पंचायत समिती, मोहाडी, श्री प्राणहंस नानाजी मेहर,कृषीभूषण शेतकरी, कुशारी होते. सदर कृषीदिनानिमित्त प्रसंगी खरीप हंगाम 2021 मध्ये तालुकास्तरीय भात पीक स्पर्धेत विजेते शेतकऱ्यांचे शॉल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले व त्यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले,तसेच तालुका कृषी अधिकारी यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना तासेच इतर योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमास विभागाचे कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.