![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
लातूर जिल्हा प्रतिनिधी/ राठोड रमेश पंडित
लातूर:- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्याच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य महाराष्ट्रात केले आहे असे उद्गार मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष श्री अशोकराव चापटे यांनी काढले.
अहमदपूर येथे छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपच्या मैदानावर सकाळी सात वाजता साजरी करण्यात आली त्या जयंती महोत्सवामध्ये ते बोलत होते.त्यांनी पुढे असे सांगितले की अण्णाभाऊ साठे हे जगातले आठवे आश्चर्य आहे की ज्यांनी दीड दिवस शाळा शिकून एवढं मोठं साहित्य निर्माण केलं जे की साहित्य क्षेत्राची अतिउच्च पातळी आहे
त्यांनी कथा कादंबऱ्यातून समाजाच वास्तव चित्रण पुढे आणलं.
अण्णाभाऊंनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी कलापथकाच्या माध्यमातून खेडोपाडी पायी फिरून लोकांमध्ये स्वातंत्र्या बदल जाणीव जागृती केली आणि आपली जगप्रसिद्ध फकीरा कादंबरी बाबासाहेबांच्या कार्याला अर्पण केली. दीन दलितांचा उद्धार करायचा असेल तर बाबासाहेबांच्या विचाराशिवाय पर्याय नाही असे खडसावून त्यांनी समाज बांधवांना सांगितले.याप्रसंगी छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपचे मधुकर जोंधळे, माधवराव तिगोटे, एन डी राठोड यांनीही अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. या जयंती महोत्सवात छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते
जयंती महोत्सवाचे सूत्रसंचालन अविनाश मंदाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन हभप संजय महाराज नागपूरने यांनी मानले