![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
अमरावती जिल्हा प्रतीनीधी/ रविंद्र रामदास मेश्राम.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंनी दिल सभागृहात आसवांसन
इरविन चौक येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसर सौंदर्यीकरण करण्यासाठी जागा मालक श्री गट्टानी यांच्यासोबत मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी स्वतः बैठक बोलवून मध्यस्थी करून त्यांना 15 दिवसाचे आत वाटाघाटिसाठी बोलवावे व सदर जागा पुतळा सौंदर्यीकरण करण्यासाठी अधिग्रहित करावी,तसेच छत्री तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक साठी मंजूर 30 करोड च्या निधीतून करावयाच्या विविध कामांचा विकास आराखडा तयार करून स्मारक पूर्णत्वाचा कालावधी निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या समक्ष 15 दिवसाचे आत बैठक लावावी या मागणी साठी विधानसभेत लक्षवेधी द्वारे मागणी
अमरावतीचे हृदयस्थळ असणाऱ्या व लाखो आंबेडकरी अनुयायांचे श्रद्धास्थान असणाऱ्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची स्थापना 1968 साली तत्कालीन विधानपरिषद उपसभापती श्री रा.सू.उपाख्य दादासाहेब गवई,पंजाबराव दंदे, दे.झा.वाकपांजर,श्री श्रृंगारे आदी मान्यवरांनी केली होती,भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनीही यात सक्रिय सहभाग घेतला होता,आज हे स्मारक म्हणजे लाखो आंबेडकरी अनुयायांचे पवित्र श्रद्धास्थान असून या परिसराचा विकास व्हावा म्हणून खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी 2 करोड चा निधी सुद्धा दिला आहे, लगतच्या 6000 वर्गफुट जागेचे ताबेदार श्री गट्टानी यांना जागा मोबदला म्हणून देण्यासाठी 2.5 करोड रुपये मनपा प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले आहे,परंतु आजही ती जागा विवादात असून यामुळे कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे विधानसभेत लक्षवेधी द्वारे सभागृहाच्या लक्षात आणून दिले व मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी यात जातीने लक्ष घालून तोडगा काढावा अशी मागणी सभागृहात केली
राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अमरावती येथील ब्रिटिश कालीन छत्री तलाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक व्हावे यासाठी 30 करोड चा निधी मंजूर केला आहे,परंतु या विकासकामाचा आराखडा(डीपीआर)अद्यापही तयार झाला नसून तांत्रिक बाबी,निविदा प्रक्रिया बाकी आहे करिता मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी याही बाबीत लक्ष घालून हे काम लवकरात लवकर पूर्ण होवून तमाम शिवप्रेमींच्या भावनांचा आदर व्हावा यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक लावावी अशी मागणी सुद्धा या लक्षवेधी द्वारे केली
मांडलेल्या सर्व भावनांची गांभीर्याने दखल घेवुन आपण 15 दिवसाचे आत बैठक घेवू त्याचे निराकरण करू असे अभिवचन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिले