लातूर जिल्हा प्रतिनिधी/ राठोड रमेश पंडित
लातूर:- अहमदपूर शहरामध्ये ऑटो रिक्षा चालक आपल्या ऑटो मध्ये नियमबाह्य आतील आरसा लावून आपल्या प्रवाशीमहिलांना , युवतींना लज्जास्पद वाटेल अशा प्रकारे पाहत होते हा प्रकार बऱ्याच दिवसापासून चालु होता याची दखल घेऊन वाहतूक पोलीस अहमदपूर विशाल मुंडे यांनी नियमबाह्य आरसे लावलेली आरसे काढून ऑटो वर कार्यवाही केली विशाल मुंडे यांच्या या कामगिरी बद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केलं जातं आहे.