
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
गोरेगाव- येथील ग्राम आंबेतलाव येथे बिरसा मुंडा उत्सव समितीच्या वतीने आज दि. 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. गिरधारीजी बघेले(सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती गोरेगाव), उपाध्यक्ष सौ. धनवंताबाई पटले (सरपंच ग्रा.पं.आंबेतलाव), उदघाटक मा. मोहनलालजी बारसागडे (अध्यक्ष, तंमुस), दीपप्रज्वलक अरविंदजी यावलकर, प्रमुख वक्ते राजुभाऊ चौधरी (अध्यक्ष से स सं), लोकराजजी बघेले (उपसरपंच ग्रा. पं. आंबेतलाव), विशेष अतिथी फनिंद्र पटले(उपाध्यक्ष भाजयुमो) आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा.पं सदस्य नूतनलालजी बघेले, चंद्रसेन बघेले, रेखाबाई चौधरी, सुरेखाबाई चव्हाण, जयाबाई मडावी, तसेच योगेशजी चौधरी, निलकंठजी पारधी, नान्हूजी चौधरी, हेतरामजी पटले, कुसनजी मडावी, भरतलालजी टेंभरे, फगणजी उईके, लुरणजी मडावी, डोमाजी मेश्राम, कारुजी पटले, ताराचंदजी कुर्वे, सेवकजी चौधरी, हेमराजजी वट्टी, योगराजजी पुसाम, हिवराजजी मरसकोल्हे, गुलाबाचंदजी बिसेन, सेवाजी पारधी, राधेलालजी चौधरी, दीनदयालजी पारशी, सोमाजी मडावी, सेवकजी उईके, लालचंद भैरम, गुणीलाल बारसागडे, दादी पारधी, दिलीप चौधरी, गुणेश कटरे, गुणीलाल तुरकर, तेजराम खोब्रागडे, मनोज खोब्रागडे, डिंगबर बागडे, राजकपूर रामटेके आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष, उद्घाटक तसेच प्रमुख वक्ते यांनी आपल्या भाषणातून भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकून आदिवासी दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमाचे संचालन मेघनाथ मरसकोल्हे यांनी केले तर आभार टामराज उईके यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बिरसा मुंडा समितीच्या सौ. सरुबाई सराटे, शिशुबाई पुसाम, पुस्तकला मडावी, पंचफुला मरसकोल्हे, शिलाबाई पुसाम यांच्यासह बालू उईके, घनश्याम मरसकोल्हे, सुनील पुसाम, सचिन पुसाम, विक्की मडावी, तेजलाल उईके, महेश चौधरी, गजानन पारधी, भिजेंद्र रहांगडाले यांनी परिश्रम घेतले.





Total Users : 883180
Total views : 6488646
