सालेकसा तालुका प्रतिनीधी/ अशोक कटकवार
दि. 13/08/2023 रोज रविवार ला स. 8.45 ध्वारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यात आझादी का अमृत महोत्सव समारोप निमित्ताने ध्वारोहणाचा कार्यक्रम मा. श्री प्रभाकरजी दोनोडे यांच्या अध्यक्षतेखाली, ध्वजपूजक सरपंच श्ध्वरी नरेश टिकारामजी कावरे,ध्वजरोहक मा. सौ. अफरोज पठाण उपसरपंच, ग्रामसेवक श्री ओ के रहांगडाले , सदस्य श्री डा. अजय उमाटे , सदस्य श्री वसंत साखरे, सदस्या कु सुमनताई ठाकरे, सदस्या सुषमाताई काळे, सदस्या सौ सुनीताताई चकोले, माजी सरपंच श्री नारायणजी काळे, शिपाई श्री भोजराज गजभिये, संगणक परिचालक श्री विनोद मोहबे, पाणी पुरवठा कर्मचारी श्री रुपेश बघेले,सामाजिक कार्यकर्ते श्री प्रदीपजी देशमुख, श्रीमती उमाबाई गजभिये, अंगणवाडी मदतनीस सौ सीमाताई दोनोडे व इतर गावकरी, प्रतिष्ठीत नागरिक यांच्या उपस्थितीत ध्होवजारोहण चे कार्यक्रम पार पडले.
२. दिनाक १४/०८/२०२३ रोज सोमवार ला सकाळी ९.०० वाजता “मेरी मिट्टी मेरा देश” कार्यक्रमांतर्गत ग्राम पंचायत सातगाव ता. सालेकसा ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्यसैनिक, वीरांना वंदन कार्यक्रम तसेच निवृत्त सैनिक बांधवांचा सन्मान सोहळा संपन्न करण्याचे आयोजन करण्यात आले आहे…….
सर्वप्रथम वीर जवानांना सलामी देण्यात येईल व त्यानंतर गावातील निवृत्त जवानांचा सत्कार करण्यात येईल.
दिनांक १४/०८/२०२३ रोजी ग्रामपंचायत सातगाव येथे गावातील 8 माजी सैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे यात प्रामुख्याने……
1) श्री अशोकजी मेहर
2) श्री गणपतजी राउत
3)श्री शैलेशजी वालदे
4)श्री तेजरामजी उईके
5)श्री अनन्तरामजी कोरे ..
6) श्री आत्मारामजी कोरे
7) श्री प्रफुलजी कोरे
8) श्री नीलमसिंहजी ठाकूर या आठ ही निवृत्त सैनिकांचा सन्मान गावचे सरपंच श्री नरेश टिकारामजी कावरे यांचेसह उपसरपंच सौ अफरोजताई पठाण, ग्रामसेवक श्री ओ के रहांगडाले , सदस्य श्री डा. अजय उमाटे , सदस्य श्री वसंत साखरे,सदस्य श्री गौरव कोडापे, सदस्या कु सुमनताई ठाकरे, सदस्या सुषमाताई काळे, सदस्या सौ सुनीताताई चकोले, सदस्या श्वेताताई अग्रवाल व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सरपंच श्री नरेश टिकारामजी कावरे आपल्या मनोगतामधून सैनिकांच्या बद्दल ,त्याच्या अथक परिश्रमाबद्दल,शौर्याबद्दल , त्यांच्या साहसाबद्दल तसेच त्यांच्या कठोर अश्या सेवेमुळे आपण कसे सुरक्षित आहोत या बद्दल सविस्तर पणे माहिती सर्व उपस्थिताना देणार आहेत. तसेच रिटायर्ड फौजि हे सुद्धा आपले मनोगत व्यक्त करत ग्रामपंचायतीचे आभार मानणार आहेत. .
सदरील कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व सर्व गावकरी नागरिकांना उपस्थित राहण्याची विनंती ग्राम पंचायत सातगाव यांनी केली आहे.
3. दि 15/08/2023 रोज मंगळवार सकाळी 8.30 ला स्वतंत्र दिना निमित्त ध्वारोहणाचा कार्यक्रम मा श्री सरपंच नरेश टिकारामजी कावरे सरपंच ग्राम पंचायत सातगाव यांच्या अध्क्षतेखालील साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व गावकरी, ग्राम पंचायत पदाधिकारी, सर्व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, इतर शासकीय निमशासकीय कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपली उपस्थिती दर्शवून सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात सहकार्य करण्याची विनंती मा सरपंच ग्राम पंचायत सातगाव यांनी केली आहे.