
गोंदिया जिल्हा प्रतिनिधि/ अविकुमार मेश्राम
अर्जुनी मोर/ तालुक्यातील झरपडा येथे दि २३ ला गावातील सरपंच मनोज भालकांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी वनसमिती सचिव वनरक्षक पडोळे प्रामुख्याने उपस्थित होते तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते ग्रामसभेची सुरुवात ग्रामसेवक नीलकंठ मडावी यांनी विविध विषय वाचन करून त्या विषयाचे निकष वाचन करून दाखवले तसेच गावातील मनरेगा कामे,घरकुल योजना या विषयी सुद्धा माहिती दिली.गावात किमान १० वर्षापासून चार ते पाच अवैध दारू दुकाने व सट्टा बाजार चालतो यावर आडा घालण्यासाठी अजूनपर्यंत कोणत्याही तमुस अध्यक्षाने काहीही केले नाही उलट दुकाने वाढत गेली तरुण व्यसनाधीन जाऊ लागली शेवटी महारष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत प्रगती ग्रामसंघाच्या वतीने महिलांनी पुढाकार घेऊन यावर आडा घालण्याचा प्रयत्न केला आणि जवळपास त्यांना यश मिळू लागले ही त्यांचे कार्य बघून आज चा ग्रामसभेत गावातील तमुस समितीची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये जास्तीत जास्त महिलांचा समावेश करण्यात आला त्यामध्ये अध्यक्ष म्हणून रीता सिद्धार्थ मेश्राम यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच निशा मस्के,पृथ्वी मस्के,प्रगती मेश्राम, वालंबा गजभिये,कुसुम नेवारे,ताराबाई मस्के,जिजा मस्के,पायल ठाकरे,यशोदा मस्के,निरू ठाकरे,मुन्नी ठाकरे,लालन हुमणे,सुवर्ण मेश्राम,कांचन मेश्राम,रोशनी मसराम,अलका मस्के,कल्पना मेश्राम यांची सदस्य पदी निवड करण्यात आली.सभेनंतर सर्व नवनियुक्त महिलांनी सरपंच मनोज भालकांडे व माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य ,उपसरपंच शलिक राऊत यांच्या समक्ष आपलं गाव आपला विकास यावर शपथ विधी घेण्यात आली





Total Users : 883186
Total views : 6488654
