![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
लातूर जिल्हा प्रतिनिधी/ राठोड रमेश पंडित
लातूर : -उदगीर बस आगार बऱ्याच दिवसापासून उदगीर निलंगा एकही बस चालवत नसल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना निलंगा बस आगारावर अवलंबून राहावे लागत आहे ह्या निलंगा आगाराच्या बसेस वेळेत येत नसल्यामुळे या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी हेळसांड होत आहे उदगीर बसस्थानकाच्या बसेस त्वरित सोडण्यात याव्या अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे
सविस्तर माहिती अशी की उदगीर बस आगाराला दीड से ते पावणे दोनशे बस अपेक्षित आहेत परंतु उदगीर अगाराला सत्तर बहात्तर बस उपलब्ध आहेत त्यापैकी चार पाच बस नेहमी खराब झालेल्या असतात त्यामुळे निलंगा उदगीर बस चालविणे शक्य नाही असे उदगीर आगाराचे म्हणणे आहे उदगीर आगार निलंगा बस सोडेना व निलंगा बसेस वाढवेना त्यामध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे उदगीर व निलंगा या दोन तालुक्यात देवणी तालुका अडकला आहे देवणीसाठी स्वतंत्र बस नसल्यामुळे तासन तास ताटकळत उभा राहावे लागत आहे उदगीर तालुका विद्यमान कॅबिनेट मंत्री यांचा मतदारसंघ आहे सध्या मंत्री महोदय यांचे सर्व कार्यालय बांधकाम याकडे लक्ष आहे मात्र बसविना प्रवाशांचे हाल होत आहेत याकडे मात्र दुर्लक्ष असल्याचे प्रवाशातू बोलले जात आहे
संपूर्ण महाराष्ट्रात उदगीर तालुका सर्वात मोठा तालुका असून या तालुक्याला महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक ह्या सीमा अगदी दहा वीस किलोमीटर अंतरावर असल्याने सर्व राज्याचे व्यवहार उदगीरशी आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात दळणवळण आहे त्यामुळे उदगीरसाठी अपेक्षापेक्षा मुबलक बसेस अपेक्षित आहेत त्यामुळे उदगीर तालुक्याच्या विकास होईल उदगीर तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा द्या अशी मागणी होत असताना लोकांना लागणाऱ्या भौतिक सुविधा चे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे बस आगाराकडून होणारी हेळसांड थांबवा अशी मागणी करण्यात येत आहे गिरीधर गायकवाड