प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
अचलपूर(परतवाडा)नगरपालिकेचे उपाध्यक्ष,समाजाचे जेष्ठ नेते व जनसामान्यांचे कैवारी श्री अनिल भाऊ पिंपळे यांना महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटनेच्या वतीने अष्टमासिध्दि मंगल कार्यालय, परतवाडा, अमरावती येथे रविवारी दिनांक 20 ऑगस्ट 2023 ला समाज भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.श्री अनिलजी पिंपळे यांची समाजातील व जनसामान्यांनमधील भरीव कामगिरी वाखाणण्याजोगी आहे.समाजात गोरगरीबांना मदत करने व कठीण प्रसंगी सर्वतोपरी मदत करून धावुन जाण्याचे काम ते आतापर्यंत करीत आले आणि आताही त्याच उम्मीदिने आजही जनसेवा करतात.त्यांनी शुन्यातून आपली जबाबदारी पार पाडुन विश्व उभं केलं.परंतु पैशाला महत्त्व न देता जनसामान्यांची सेवा करून समाजात नाव लौकिक केले आहे ही समाजासाठी गौरवास्पद बाब आहे.त्यामुळे त्यांना समाजाच्या व जनसामान्यांच्या सेवेच्या माध्यमातून समाजाच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी समाज बांधवांच्या कामात नवीन ऊर्जा निर्माण व्हावी या उद्देशाने पदाधिकाऱ्यांची वेगवेगळ्या पदांवर नियुक्ती करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून श्री चंद्रपालजी चौकसे(समाजाचे जेष्ठ नेते)प्रामुख्याने उपस्थिती होते.त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून श्री बल्लुभाऊ जवंजाळ( प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष),श्री सुनिल खराटे(अध्यक्ष सावकलाल),श्री रमेश लांजेवार (लेखक/साहित्यिक/स्वतंत्र पत्रकार), संतोष जैस्वाल (माजी न्यायाधीश, मुंबई) श्री आशीष बिजवल(उपजिल्हाधिकारी अमरावती) श्री दयाराम राय झांशी, श्री सुनिल पाचपोर(आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट पटु), श्री संतोष बोरेले (सभापती कृ.उ.बा.स.पांढरकवडा),श्री खिलेंद्र बिठले, श्री फालगुन ऊके, श्री सुरेश चौरीवार,सौ संगिता ठलाल,आशिष सहारे, श्री नरेंद्र दुवारे, श्री तुषार कमल पशिने (कलचुरी सेना महाराष्ट्र अध्यक्ष),सन्नी नशिने (सचिव) यांनी अनिलजी पिंपळे यांच्या कार्याची माहिती दिली व समाजाला प्रगती पथावर नेण्याच्या उद्देशाने सर्वांनी एकत्रीत कार्य करण्याची शपथ सर्वांनीच घेतली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रास्ताविक सौ रेखाताई प्रिंप्राळे यांनी केले व आभार तिर्थराज बिजेवार यांनी केले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटना अध्यक्ष सागर समुद्रवार,सरचिटणीस संतोष खंबलवार, सौ सिमा खंबलवार,श्री नंदलाल कावरे,श्री सुरेश मेश्राम, श्री रविंद्र हटवार,श्री संजय हिवाळे ,श्री बाळासाहेब लाळे,श्री दिपक ऊके आदिंसह अनेकांनी कठोर परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.