![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
देवरी तालुका प्रतिनिधी/ कन्हैया क्षीरसागर
देवरी तालुक्यातील ग्राम फुक्किमेटा येथे शेखडोच्या संख्येने भाविक भक्त कवडयात्रा मध्ये उपस्थित होते. कावडयात्रा सलियाटोला ते एडुकचुवा मार्ग महादेवघाट लोहारा येथे प्रस्तन करण्यात आली.
सदर कावड यात्रा हिंदू धर्म शास्त्रानुसार चतुर्मास प्रारंभ झाल्यावर येणारा पहिला मास हा श्रावण मास रूढी परंपरेनुसार या मासापासून व्रत सुरू होतात. या मासात श्रावणी सोमवार, नागपंचमी, गोकुळ अष्टमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन शुक्रवारचे व्रत असे अनेक व्रत केले जातात. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवार हे व्रत केले जाते. श्रावण मासातील सोमवारी शिवच्या मंदिरात जाऊन शिवपिंडाला अभिषेक घालने, पूजा करणे ,शिवमुट वाहने अशाप्रकारे हे व्रत केले जाते.या करीता फुक्किमेटा अंतर्गत सलियाटोला इथून कावड यात्रा मध्ये शेखडोच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.