![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
भंडारा जिल्हा प्रतिनिधी/ जीवन वनवे
एक वर्षापासून जलजिवन मिशन अंतर्गत नळ योजनेचे काम कासवगतीने सुरू…सहा गावच्या नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती…
तुमसर: विस वर्षांपासून रखडलेल्या देव्हाडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाला वर्ष भरापुर्वी प्रशासकीय मान्यता मिळाली व काम सुरु असले तरी अद्यापही परसवाडा येथिल पाणीपुरवठा योजने अंतर्गत येत असलेल्या जल जिवन मिशन पाणी पुरवठा नळ योजनेचे काम गेल्या एक वर्षापासून कासवगतीने सुरु असुन सदर काम थंड बस्त्यात आहे.तर येथिल प्रादेशिक पाणी योजनेचे विशालमय जलकुंभ शोभेची वास्तु ठरत असल्याने
परिणामी येथिल नागरीकांना भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.
सदर देव्हाडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजने अंतर्गत परसवाडा (दे), ढोरवाडा,स्टेशनटोली ,
मांगली,खापा,हसारा,या सहा गावांचा समावेश असून सदर सहा गावांचा प्रादेशिक पाणीपुरवठा योजने अंतर्गत जल जिवन मिशन अंतर्गत नळ योजनेच्या कामाला
जि. प. भंडारा कडून जि .प मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या पत्रानुसार २५/०७/२०२२ ला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली होती सदर योजनेच्या कामाची किंमत ३,७९,९०,६६६/-(तिन कोटी एकोनऐंशी लाख, नव्वद हजार सहाशे, सहासष्ट रुपये)एवढी असून उपरोक्त योजनेची निवेदा प्रक्रिया झाली व कामाला सुरुवात झाली असली तरी अद्यापही कामाला गती प्राप्त झाली नसल्याने सदर काम आजही कासवगतीने सुरु असुन योजना थ़डबस्त्यात पडली आहे.
या विषयी शिवसेनेचे युवा सेना प्रमुख तथा परसवाडाचे उपसरपंच पवन खवास यांनी सदर पाणी पुरवठा योजनेच्या कामा संदर्भात वर्ष भरापुर्वी आंदोलन केले होते.याच आंदोलनाचा धसका घेत जि. प.भंडारा व प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाला प्रशासकीय मान्यता प्रदान करून कार्यऱभ आदेश दिला होता .येथे वर्ष भराचा काळ लोटून सुध्दा काम अद्यापही पुर्ण करण्यात आले नसल्याने येथिल जल जिवन मिशन अंतर्गत नळ कनेक्शन घेऊ इच्छिणाऱ्या नागरीकांना मात्र आजही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा येथे संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या व कंत्राटदारांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत असून याकडे संबधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
देव्हाडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजने अंतर्गत परसवाडा (दे)येथिल जल जिवन मिशन अंतर्गत नळ योजनेच्या काम अद्यापही थंड बस्त्यात आहे.व काम कासवगतीने सुरु आहे.त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.सदर काम त्वरीत पुर्ण करण्यात यावे. अन्यथा सहा गावातील नागरीकांसमवेत खापा चौकात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
पवन खवास उपसरपंच परसवाडा (दे) तथा तालुका युवा सेनाप्रमुख तुमसर.
देव्हाडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सहा गावात सुरु असलेले काम येत्या पंधरा ते विस दिवसात पुर्ण करण्यात येईल.
देवगडे अभियंता पाणी पुरवठा विभाग पंचायत समिती तुमसर