![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
तुमसर: मागील काही दिवसांपासून तुमसर शहरात डेंगु आणि मलेरीया सारखे धोकादायक संक्रमण मोठया प्रमाणात पसरतानी दिसत आहे.आता ची परिस्तिथी बघता भंडारा जिल्या मध्ये डेंगू चे 6 पेशंट वाढले असून तुमसर तालुक्यात काही दिवसा पूर्वी एक युवक डेंगू मुळे दगावलेला आहे.
तुमसर शहरात डेंगुचा प्रादुर्भाव वाढ होऊ नये म्हणुन इंजि.सागर गभने यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद तुमसर सिद्धार्त मेश्राम यांच्या शी चर्चा केली होती कि शहरातील प्रत्येक प्रभागात नियमितपणे जंतुनाशक फवारणी करण्यात यावी व या जनजागृती करुन जनतेला सतर्क करण्याची गरज आहे.
डेंगू चा वाढत प्राधुर्भाव बघता इंजि. सागर गभने यांनी आपल्या टीम व नगर परिषद कर्मचाऱ्यांसोबत विवीध प्रभागात जनजागृती करत केमिकल फवारणी केली.यावेळी इंजि.सागर गभने यांनी सांगितले की डेंग्यू हा रक्त शोषणाऱ्या डासांपासून होणारा एक आजार आहे,प्रामुख्याने हा आजार एडीस इजिप्ती या नावाची मादी आजार पसरवते.यातून बचाव करण्यासाठी आपण स्वतः काळजी घेणे गरजेचे आहे.डेंग्यू हा शुद्ध पाण्यामध्ये होत असून कुलर मध्ये साठलेला पाण्यात , टायर मध्यल्या पाण्यात,पडलेल्या डिस्पोजल मधल्या पाण्यामध्ये, फ्रिज च्या मागच्या बाजूला जिथं पाणी जमा असतो त्या पाण्यात, व असे ठिकाण ज्या ठिकाणी पाणी खूप दिवसापासून साठलेला असतो पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो अशा भागात डेंग्यूचे प्रमाण वाढत आहे.
त्यामुळे आपले घर व परिसरात कुठेही पाणी साठू देऊ नका, आपण ज्या भांड्यामध्ये पिण्याचे पाणी भरत असतो ते आठवड्याला स्वच्छ करून त्याला वाळू द्या एक-दोन तासानंतर त्यात पाणी भरा, घरावरची पाण्याची टाकी नियमित स्वच्छ करत रहा हि काळजी घेतल्याने डेंग्यूच प्रसार होणार नाही. यावेळी इंजि.सागर गभने, प्रदीप भरणेकर,राहुल रणदिवे,संकेत गजभिये,अनुप तिडके,अजय सिडाम,सोनू तरारे,बालेश्वर लांजेवार,फिरोज शेख,नवशाद शेख,आयुष कुंनजेकर,सोमेश्वर लांजेवार,यश बडवाईक,मनीष बोन्द्रे,नितेश बडवाईक,भावेश पाल,दीपक बिंझोळे,नितेश काम्बळे,गोलू खांडेकर,सुशील राणे, दीपक पानसे,निश्चल गजबिये साहिल पाटील,बादल टेंबरे,सुमित कावळे,उपस्थित होते.