
गोंदिया जिल्हा प्रतिनिधि/ अविकुमार मेश्राम
गिऱ्हेपुंजे पब्लिक स्कूल येथे जागतिक आदिवासी दिवस व क्रान्ति दिन साजरा
सड़क अर्जुनी: येथिल गिऱ्हेपुंजे इंग्लिश पब्लिक स्कूल येथ आज दि 9 ऑगस्ट ला जागतिक आदिवासी दिवस व क्रांति दिवस उत्साहात साजरा करण्यत आला त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव शेषराव गिऱ्हेपुंजे,प्रमुख अतिथि म्हणून प्राचार्या डॉ दया राउत,सीमा यावलकर उपस्थित होते प्रारंभी पहुण्यांच्या हस्ते माता सरस्वती व जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले नंतर कार्यक्रमा प्रसंगी विद्यार्थ्यांनी जांगलाचा राजा या गीतावर आदिवासी नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली
कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष यानी विद्यार्थ्याना आपल्या मार्गदर्शनातुन संगीतले की आई वाडिल हे आपले गुरु असतात त्याच प्रमाने आदिवासी यांचे गुरु आणि भगवान सुद्धा बिरसा मुंडा होते इंग्रजसोबत लढता लढता त्यानी आपल्या आदिवासी बंधवासाठी आपल्या प्राणाची आहुति दिली त्याप्रमाने अपल्याला एखाद्याला भगवान समजण्यापेक्षा त्या महापुरुषांचे व्यक्तिचरित्र वा गुण आत्मसात करावे कारण ” थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पाहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा “असे प्रतिपादन संस्थासचिव शेषराव गिऱ्हेपुंजे यानी आपल्या मार्गदर्शनातुन केले ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते तसेच जननायक बिरसा मुंडा ही आदिवासींचे जननायक कसे झाले त्यांचे जन्मपासून ते मृत्युपर्यंतचा काळ शाळेच्या प्राचार्या डॉ दया राउत यानी विद्यार्थ्याना आपल्या मार्गदर्शनातुन संगीतले तसेच क्रांति दिनाविषयी माहिती विषद केली समोर त्या म्हणाल्या की, जीवनात खरा बिरसा व्ह्यायच असेल तर मनात जिज्ञासा वृत्ती व चिकाटी असणे आवश्यक आहे तेव्हाच आपण आपल्या जीवनाचे भविष्य घडवू शकतो.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार विद्यार्थिनी प्रतिनिधी शिफा शेख हिने मानले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विष्णू चाचेरे,नमिता गौतम,नीलिमा गणवीर, मोनाली कोटांगले,शिल्पकार माने,लीना रहेले,निशा शेंडे,उत्तरा वरखेडे, सोनाली बडोले,अश्विनी शिंदे,सारिका बडवाईक,वेनेश्वरी राणे,अनिता चांदेवार तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी नानू निंबेकर व इतर यांनी परिश्रम घेतले





Total Users : 883093
Total views : 6488529
