



भंडारा जिल्हा प्रतिनिधी :- जीवन वनवे
तुमसर शहरातील पंतप्रधान घरकुल योजना (शहरी) अंतर्गत नगर परिषद तुमसर तर्फे घरांचे बांधकामास पहिल्या हप्ता मिळाल्या नंतर घरकुल लाभार्थ्यांनी घराच्या बांधकामास सुरुवात केली खरी मात्र दुसऱ्या व तिसऱ्या हप्ता ची निधी मिळण्यास बराच कालावधी लागत आहे. परिणामी घरकुल लाभार्थ्यांना पावसाळ्यात उघड्यावरच संसार थाटण्याची वेळ आली असून पालिका प्रशासनाने येत्या आठवड्याभरात घरकुल लाभार्थ्यांना थकबाकी द्यावी अन्यथा नगर परिषदे सामोर घरकुल लाभार्थ्यांसह रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी दिला आहे.
नगर परिषद तुमसर तर्फे शहरातील प्रधानमंत्री घरकुल योजने अंतर्गत सन २०२०ते २०२२ मध्ये मंजूर झालेल्या जवळ पास २०० घरकुल लाभार्थ्यांनी आपली जुनी राहती घरे पाडून घरकुलाचे बांधकाम हाती घेतले. मात्र पक्के घर बांधकामासाठी अनुदान मिळणार असल्याने संबंधित लाभार्थिंनी जुने घर पाडून नवीन घराचे बांधकाम सुरू केले. अनुदानाचा दुसरा हप्ता अनेकांना मिळाला नसल्याने राहण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जुने घर पाडल्याने आणि नवीन घर अर्धवट असल्याने अनेकांवर झोपडीवजा घरात राहण्याची वेळ आली आहे. तर १५५ घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलाचे बांधकाम जवळ पास पूर्णच झाले आहे परंतु त्यांना अजून हि तीसऱ्या हप्त्याचा अनुदान मिळाला नाही .त्यामुळे हे घरकुल लाभार्थी आर्थिक व मानसिक अडचणीत सापडले आहेत. घरकुलासाठी मंजूर असलेला उर्वरित निधी मिळावा, याकरिता दररोज पालिका कार्यालयात खेटे घालत आहेत. घरकुलाचे बांधकाम करून आर्थिक उसनवारी व देणे घेण्याच्या चक्रव्यूहात घरकुल लाभार्थी सापडले आहेत. त्यामुळे घरकुला चा उर्वरित निधी तात्काळ मिळावा यासाठी घरकुल लाभार्थ्यांसह नगर परिषदे सामोर रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी दिला आहे
पहिला हप्ता दिल्यानंतर पुढचे पैसे मिळालेच नाहीत. त्यामुळे पडके घर तोडून पक्क्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांच्या डोक्यावरचे छप्पर गेले आहे. परिणामी या लाभार्थिंना अनेक गैरसोयींना सामाेरे जावे लागत आहे. लाभार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरू.
अभिषेक कारेमोरे माजी नगराध्यक्ष तुमसर.