प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
भंडारा- महात्मा गांधी,भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,पंडित जवाहरलाल नेहरू,भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत दीप प्रज्वलन करून नम्र अभिवादन करण्यात आले.ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांनी भाषण,लोकगीत,लोकनृत्य या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित पावने मंडळी गावातील नागरिक यांना समाजहित कसे जोपासावे व देशाप्रती आपल्या भावना कशा जोपासता येईल याचे मार्मिक उदाहरण सादर करण्यात आले आहे.आणि अध्यक्षीय भाषतून ओबीसी क्रांती मोर्चाचे संजय मते यांनी सांगितले की भारत देशात व महाराष्ट्र राज्यात 52 टक्क्यांपेक्षा जास्त लोक संख्या असलेल्या ओबीसी समाजाला टक्केवारी नुसार आरक्षण लागू करण्यास कोण विरोध करतात याचा शोध घेण्याची काळाची गरज असून ओबीसी बांधव घेतील काय असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला आहे.ओबीसी समाजाची जात निहाय
जनगणना करण्यास कोण तयार नाही.किंवा कोण विरोध करतात हे ओबीसी समाजातील बुद्धिवंत,विचारवंत,अभ्यासक,सुजाण नागरिकांनी समजून घेणे महत्त्वाचे झाले आहे असे सांगितले
यावेळी लोकांची शाळा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिपरी पुनर्वसन येथे आपल्या देशाचा ७७ वा स्वतंत्र्यदिन साजरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी क्रांती मोर्चाचे तालुकाध्यक्ष सुधीर सार्वे,श्री.देविदास ठवकर ,सरपंच ग्रा.पं.पिपरी,श्री.राजु चन्ने,उपसरपंच इतर सदस्य गण.लोकांची शाळेचे मुख्याध्यापक श्री.मनोहर गाढवे,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक श्री.नाकाडे सर,पिपरी येथील प्रतिष्ठित नागरिक श्री.लहानुभाऊ कातोरे,नानाजी कारेमारे,जिल्हाप्रेमी श्री.भाऊ कातोरे,दामाजी शेंडे,विनायकजी कारेमारे,प्रकाशजी पंचबुधे,अंगणवाडी सेविका श्रीमती उषाताई गाढवे,शाळेतिल कर्मचारी श्री.वाहाणे सर,श्रीकांत वैरागडे,नाना गजभिये,सौरभ ढेंगे,शालू भडके,रेखा तिजारे,सौ.मस्के मँडम,उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन सौ.अंजली बाभरे,प्रास्ताविक श्री.झंझाड सर आणि आभार प्रदर्शन श्री.खोब्रागडे सर यांनी केले.