![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
भंडारा जिल्हा प्रतिनिधी/ जीवन वनवे
संभाजी ब्रिगेड ची मागणी… न झाल्यास आंदोलनाचा इशारा…
तुमसर,भंडारा – बालाघाट रस्ता तात्काळ दुरुस्त करा. असे निवेदन उपविभागीय अभियंता तुमसर /मोहाडी यांना संभाजी ब्रिगेड शाखा तुमसर वतीने देण्यात आले.तुमसर भंडारा बालाघाट राष्ट्रीय महामार्ग घोषित झालेला आहे. काम अजून पर्यंत सुरू झालेला नाही. पावसाळ्यामुळे रस्त्याला ठिकठिकाणी लहान मोठे गड्डे पडले असून जाणाऱ्या येणारा ना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. या समस्येची दखल घेत संभाजी ब्रिगेड शाखा तुमसर च्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग शाखा अभियंता यांना निवेदन देऊन गड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावे असे मागणी निवेदनातून केली आहे .सात दिवसात गड्डे बुजवले नाही तर खापा चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल सर्वस्व जबाबदारी प्रशासनाच राहील. निवेदन देतानी यावेळी संभाजी ब्रिगेड शाखा तुमसर ,तालुका अध्यक्ष नाना ठवकर, नागेश्वर शरणागते तालुकाध्यक्ष मोहाडी, संजय बडवाईक महासचिव व प्रणव बोंद्रे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.