



प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
तुमसर: दुचाकीस्वार पती -पत्नी रस्त्याच्या बाजुला नातेवाईकांसोबत बोलत असताना विरुध्द दिशेने येणाऱ्या डब्लु सि एल कंपनीचा कोळसा भरलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला आमोरा समोर धडक दिली असता दुचाकीस्वार पती -पत्नी जागिच ठार झाले तर एक महीला गंभिर झाल्याची घटना तुमसर-मोहाडी राज्यमार्गवरील खरबी येथे २७ आगस्ट रोजी सायंकाळी साडे पाच वाजता दरम्यान जि प शाळेसमोर घडली .
बालचंद ठोंबरे (५५)रा.वरठी वनिता ठोंबरे (५०) असे ट्रकच्या धडकेत ठार झालेल्या पती पत्नीचे नाव आहे तर नलु दामोधर बडवाईक (४०) रा खरबी असे जखमी असलेल्या महीलेचे नाव आहे.
भंडारा -तुमसर राज्यमार्गवरून भंडारा वरुन तिरोडा अदानी कंपनी मध्ये कोळसा वाहुन नेणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच ४० सी डी ४७३७ या ट्रकने खरबी येथे महामार्गाच्या बाजुला दुचाकीस्वार उभे असलेल्या दुचाकी क्रमांक एम एच ३६ जे ६५३४ या हिरो होंडा कंपनीच्या दुचाकीला आमोरा समोर जोरदार धडक दिली असता दुचाकीस्वार पती- पत्नी जागीच ठार झाल्याची घटना घडली.तर एक महीला गंभिर जखमी झाल्याची घटना घडली. मृतक दुचाकीचालक बालचंद ठोंबरे हे रेल्वे मध्ये कार्यरत कर्मचारी होते अशी माहिती आहे.
अपघात घडताच ट्रक चालकाने घटनास्थळावरून पोबारा करीत मोहाडी पोलीस ठाणे गाठले. सदर घटनेची माहिती होताच घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. घटनास्थळावरील वातावरण चिघळत असताना घटनास्थळावरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुमसर -मोहाडी, येथिल पोलीस दाखल झाले होते.व भंडारा येथिल राज्य राखीव दलाची चमु सुध्दा दाखल झाली होती.घटनास्थळी आमदार राजु कारेमोरे,माजी आमदार चरण वाघमारे यांनी भेट दिली. सदर घटनास्थळी मोहाडी -तुमसर पोलीस दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा करून मृतकाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मोहाडी ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले असुन सदर घटनेचा पुढील तपास मोहाडी पोलीस करीत आहेत. वृत्त लिहोस्तर चालकां विरोधात मोहाडी पोलीसांत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
घटनास्थळी तुमसरचे ठाणेदार निलेश ब्राम्हणे , सहाय्यक पोलीस निरीक्षक धंदर, उपनिरीक्षक गोमलाडु,पोलीस निरीक्षक सूभाष बारसे, मोहाडी पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार, उपनिरीक्षक दुधकावरा आदीं घटनास्थळी तळ ठोकुन होते.