प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता होत आहे. सांगता समारोहा निमित्त विविध उपक्रम देशभर राबविली जात आहेत. अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात करताना घराघरावर लागलेली तिरंगी आणि प्रत्येक देशवासीयाचा दिसून आलेला उदंड प्रतिसाद अजूनही मनात घर करून आहे. या अमृत महोत्सवाची सांगताही तेवढ्याच दिमाखात व्हावी म्हणून चला तर मग तिरंगा यात्रेत सहभागी होऊ या!
दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता हुतात्मा स्मारक येथून निघणाऱ्या तिरंगा यात्रेत सहभागी होऊन देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीरांना आणि क्रांतीकारकांना नमन करू या. सारा देश देशभक्तीच्या प्रेमाने न्हाऊन निघत असताना आपणही देशभक्तीचा जागर करूया..