लातुर जिल्हा प्रतिनिधी/ नवनाथ डिगोळे
भारत राष्ट्र समिती अहमदपूर चाकूर विधानसभेचे नेते उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली चाकूर येथील रहिवासी गोविंद केदासे,सुकणी ग्रा.पं सदस्य ऋषी केदासे,बोथीचे ग्रा.पं सदस्य हणमंत कांबळे यांनी बीआरएस पक्षामध्ये तुकारामजी जाधव,नवनाथ डिगोळे,अंकुश बोमदरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला.
श्री उत्तमराव वाघ यांनी त्यांचा सत्कार करुन प्रक्षात प्रवेश दिला.
याप्रसंगी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.येणाऱ्या काळात अनेक नवतरुण व राजकीय लोकांचे प्रवेश होणार आहेत. पुढील काळात भारत राष्ट्र समिती पक्षावर विश्वास ठेऊन अनेक जण पक्ष प्रवेश करणार असल्याचे भारत राष्ट्र समिती चे नेते उत्तमराव वाघ हे प्रतिनिधीना बोलत होते.