![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
लातूर जिल्हा प्रतिनिधी/ राठोड रमेश पंडित
लातूर:- लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार सुधाकर शृंगारे सदैव तत्पर असतात. सर्वांना प्रेमाने बोलून विकास कामे करण्यावर त्यांचा भर आहे. मात्र या विकासकामात भ्रष्टचार करणाऱ्यांना ते रडारवर घेत असल्याचे पहायला मिळत आहे. आता त्यांच्या रडारवर
लातूर जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत बोगस कामे करणारे ठेकेदार अन् त्यांना साथ देणारे अधिकारी आले आहेत. या योजनेअंतर्गत झालेल्या बोगस कामांची एक समिती नेमून सखोल चौकशी करावी अन् या चौकशीचा अहवाल पाठवावा, अशी मागणी त्यांनी अधिकाऱ्यांना पत्राच्या माध्यमातून केली आहे.
लातूर जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेसाठी केंद्र शासनाने लातूर जिल्ह्यासाठी 1500 कोटीची तरतूद केलेली आहे.या कामाचे ऑनलाईन टेंडर निघून प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाली. खेडे गावातील जनतेला मुबलक प्रमाणात शुद्ध पेयजल मिळावे हा या योजनेचा उद्देश. मात्र या कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी जिल्ह्याचा खासदार म्हणून व केंद्राचा प्रतिनिधी म्हणून खासदार सुधाकर शृंगारे यांच्याकडे ग्रामस्थ करत आहेत. या कामात अनेक गावामध्ये संबंधित गुत्तेदार यांनी संबंधित अधिकारी यांना हाताशी धरून बोगस कामे करून बिल काढून घेतल्याने मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले असल्याच्या तक्रारी अर्ज ग्रामस्थ करत आहेत.
ग्रामस्थांच्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने खासदार सुधाकर शृंगारे यांनी संबंधित अभियंत्याला अहवाल मागविला पण त्या कामातही कुचराई करण्यात आल्याने खासदार सुधाकर शृंगारे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून जल जीवन मिशन योजनेचा अहवाल मागितला आहे. त्यात जल जीवन मिशन अंतर्गत कोणत्या गावात कामे सुरू आहेत, किती गावात ही कामे पूर्ण झाली आहेत, या कामासाठी आतपर्यंत कोणत्या गावात किती निधी खर्च करण्यात आला आहे. नियमानुसार कामे केली जात आहेत का ? या सगळ्या कामाची पाच जणांची समिती नेमून सखोल चौकशी करावी. या समितीमध्ये तीन शासकिय अधिकारी व दोन अशासकीय व्यक्तींचा समावेश असावा. या समितीद्वारे जीपिआरएस फोटो, व्हिडिओसह अहवाल तयार करून सात दिवसात गोपनीय पद्धतीने पाठवावा असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
आता जिल्हाधिकारी यावर तातडीने समिती नेमून अहवाल सादर करतील अशी आशा आहे, त्यामुळे जल जिवन मिशन अंतर्गत बोगस काम करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत. या अहवाल प्राप्ती नंतर खासदार सुधाकर शृंगारे काय ॲक्शन घेतील याकडे लक्ष लागले आहे.