![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
लातुर जिल्हा प्रतिनिधी/ नवनाथ डिगोळे
चापोलीच्या विकासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे दिले आश्वासन
चाकुर / चापोली :राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी चापोली येथील संजीवनी महाविद्यालयास नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय नारायणराव चाटे, संस्था सचिव तथा चापोलीचे सरपंच डॉ. भालचंद्र नारायणराव चाटे व ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री विभाचा पदभार स्वीकारल्यानंतर संजय बनसोडे पहिल्यांदाच अहमदपूर-चाकूर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी महाविद्यालयातील क्रीडा विभागाच्या वतीने आजपर्यंत केलेली दमदार कामगिरीची माहिती मंत्री महोदयांना दिली. संजीवनी महाविद्यालयाच्या प्रगतीवर समाधान व्यक्त करत महाविद्यालयाच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य करू असे आश्वासन यावेळी मंत्री संजय बनसोडे यांनी दिले.
याप्रसंगी सरपंच डॉ. भालचंद्र चाटे यांनी चापोलीच्या विविध विकासकामाविषयी सविस्तरपणे चर्चा केली. यावर मंत्री संजय बनसोडे म्हणाले की, मी स्वतः व मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील आम्ही दोघेही चापोलीच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य करू.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन मुंढे, फारूक देशमुख, सिराज देशमुख, गंगाप्रसाद मद्रेवार, ग्रामपंचायत सदस्य पाटील विश्वनाथ, हरीश कांबळे, नारायण काचे, चांद शेख, नाथा मद्रेवार, द्वारकानाथ गोरगिळे, प्रतिक स्वामी, निखील होनराव, अजय मलीशे सह ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.