![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
भंडारा जिल्हा प्रतिनिधी:- जीवन वनवे
तुमसर येथे श्रीमती गोपिकाबाई भुरे महिला महाविद्यालय तुमसर येथे दिनांक ८ ऑगस्ट २०२३ ला सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ” महिला अत्याचार व लैंगिक शोषण ” या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून माननीय मृणाल मुनिश्वर, गीताताई कोंडेवार, कल्याणी भुरे, अदिती काळबांडे, कुंदाताई वैद्य, प्रा.डॉ.कल्पना राऊत, प्रा. डॉ. निता सोमनाथे, प्रा. डॉ. मुबारक कुरैशी, डॉ.अरुणा देवगडे इत्यादी उपस्थित होते. समुपदेशक म्हणून माननीय मृणाल मुनिश्वर यांनी विद्यार्थिनींना “‘महिलांवर होणारे अत्याचार आणि लैंगिक शोषण’ या विषयावर समुपदेशन केले. तसेच सरकारच्या विविध योजना, मोबाईलचा सदुपयोग व दुरुपयोग, महिला विक्री, गोबर गॅसचा फायदा, बायोगॅस योजना, युवा रुरल असोसिएशन, अशा इत्यादी अनेक विषयाला धरून मार्गदर्शन केले. “थोडी आग चाहिये” या गाण्यातून समुपदेशन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ. गीताताई कोंडेवार यांनीही विद्यार्थिनींना “हातमाग सप्ताह निमित्त” मार्गदर्शन केले. शासनाचे धोरण, प्रचार आणि प्रसार यावर मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाच्या वरिष्ठ प्रा. डॉ. कल्पना राऊत यांनी “विद्यार्थिनींना येणाऱ्या विविध प्रसंगाचे गांभीर्य आणि प्रासंगिकता “या विषयावर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे ऍडव्होकेट मनिषा उपाध्याय यांनी “सरकारी वकील, कायदा व कानुन सुव्यवस्था” यावर मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. प्रतीक्षा बोंद्रे बायोगॅस ची रचना कशी असते याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदाताई वैद्य यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अरूणा देवगडे यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. गायत्री सिरसाम, अलिशा बर्वे, सौ.पल्लवी पाटील, उज्वला मेश्राम, सौ.प्रिती मलेवार, सौ. शोभा लांजेवार, लिला पारधी, अनिता राॅय, सौ.सिमा देशमुख, संजिवनी देशमुख आणि महाविद्यालयातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवराज सेलोकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.