
सालेकसा तालुका प्रतिनिधि/ अशोक कटकवार
आज माजी आमदार संजय पुराम यांनी भारतीय जनता पार्टी देवरीच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन 2014 ते 2019 दरम्यान आमदार असताना विधानसभा क्षेत्रात मंजूर करून आणलेल्या कामाची माहिती पत्रकारांना दिली. व आपण मंजूर केलेल्या कामाचे श्रेय स्थानीय आमदार कसे लाटत आहेत.हे पुराव्यानिशी पत्रकारांना समजावून सांगितले .यावेळी नगराध्यक्ष संजू ऊईके , उपाध्यक्षा प्रज्ञाताई संगीडवार,कृउबास सभापती प्रमोद भाऊ संगीडवार,तालुकाध्यक्ष अनिल येरणे ,पंचायत समिती उपसभापती अनिल बीसेन ,संचालक कृऊ बास सुखचंदजी राऊत, विजयजी कश्यप, बबलूजी डोये, पालीवालजी नगरसेवक संजय दरवडे सौ. कमलताई मेश्राम सीताबाई रंगारी महामंत्री प्रवीण दहिकर विनोद भाऊ भांडारकर पंचायत समितीच्या महिला सदस्य तसेच कार्यकर्ते व पत्रकार बंधू उपस्थित होते.





Total Users : 883121
Total views : 6488562
