![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
भंडारा जिल्हा प्रतिनिधी/ जीवन वनवे
तुमसर: राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंना यश मिळविले.पुणे येथे दि.२८ ते ३० जुलै २०२३ ला भिकू पठारे स्टेडियम कराडी पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये भंडारा जिल्ह्यातील खेळाडूना यश संपादन केले. ही स्पर्धा वाको महाराष्ट्र किकबॉक्सिंग अध्यक्ष निलेश शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही स्पर्धा पार पाडण्यात आली. या स्पर्धेसाठी राज्यातून ३५ जिल्हे व १७०० खेळाडूनी सहभाग घेतले होते. या स्पर्धेत भंडारा जिल्ह्यातील कु. करण नागमोते (सुवर्णपदक), कु.नयन बुराडे (रोप्यापदक), कु. दामिनी सेलोकर (रोप्यापदक), कु.भाग्यश्री नागमोते (रोप्यापदक), यांनी यश प्राप्त केले. तसेच श्री. कृष्णा वघारे यांनी रेफरी डि्लोमा कोर्स पुर्ण केले. तर इतर खेळाडूंना सहभाग प्रोत्साहन प्रमाणपत्र प्राप्त केले, तसेच यामध्ये पदक प्राप्त झालेल्या खेळाडूंची निवड २३ ते २७ ऑगस्ट रोजी रांची (झारखंड) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
किकबॉक्सिंग असोशियनचे सचिव मयुर नागमोते (प्रशिक्षक),अध्यक्ष अक्षय गिरडकर, प्राचार्य धिरेंद्र पुरोहित (महर्षी विद्या मंदिर तुमसर), प्राचार्य पंकज बोरकर (जनता वि. तुमसर), नितीन धांडे, अमोल उमरक, कमलेश राऊत, जांभूळे सर,यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.व पुढील होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरीता व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.