![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
लातूर जिल्हा प्रतिनिधी/ राठोड रमेश पंडित
लातूर- लातूर शहरात गेली दोन वर्षांपासून लोकनियुक्त नगरसेवक पदावर कार्यरत नाहीत महानगरपालिका प्रशासन /अधिकाऱ्यावर अंकुश नसल्याने कार्यालयातून अधिकाऱ्याचा मनमानी कारभार चालू असून परिणामी अनावश्यक ठिकाणी चांगल्या दर्जाचे रोडवर पुन्हा नव्याने रोड केले जात आहेत,सम्राट चौक ते लेबर कॉलनीत चांगल्या दर्जाची गटार पडून नविन गटार तयार करण्यात आली, तर आवश्यक असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात थोडे जरी पाऊस पडला की नांदेड रोडला तळायाचे स्वरूप येत असून , हे काम केले जात नाही ,वॉर्ड क्रमांक 3 मधील महादेव नगर,दत्त मंदिर समोरील डांबरी रस्ता मार्च महिन्यात शारदा कंत्राटदाराणे अर्धवट सोडून दिल्याने नागरिकांची या रोडवर वावरतांना कसरत करावी लागत आहे लातूर शहरात अशाच पद्धतीने 8 डांबरी रस्ते अर्धवट सोडून शारदा कंत्राटदार नागरिकांना वेठीस धरत आहेत का ? शारदा कंत्राटदारावर महानगरपालिका प्रशासनाचे नियंत्रण ठेवण्यातअपयश आल्याचे दिसून येत आहे सदरील कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी लातूर शहर पूर्व भाग कृती समितीच्या वतीने आपल्या कार्यालयात निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा केला असता लातूर शहर पूर्व भाग कृती समितीच्या नावे लातूर शहर महानगरपालिका पत्र पाठवून देते की सदरील कामाकरिता लातूर शहर महानगरपालिकेकडे निधी उपलब्ध नाही निधी उपलब्ध झाल्यास काम केले जाईल आपल्या कडे निधी उपलब्ध नाही तर शहरात इतर ठिकाणी होत असलेली विकास कामे आवश्यक प्राधान्य क्रमांने निवडली जात नाही या मुळे जनतेच्या पैशाची उधळपट्टी होत आहे तरी शहराचा योग्य आवश्यक ठिकणी विकास साधण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जनतेच्या संपर्कातिल माजी नगरसेवकांची शहर महानगरपालिका विकास कामाकरिता सल्लागार समनव्य समिती स्थापन करण्याची मागणी लातूर शहर पूर्व भाग नागरी कृती समितीच्या वतीने समितीअध्यक्ष दीपक गंगणे, संस्थापक सचिव बाबासाहेब बनसोडे , गणेश घोडके,भगवेश्वर धनगर , इत्यादी ने निवेदनाच्या माध्यमातून महानगरपालिका आयुक्तकडे केली आहे