
गोंदिया जिल्हा प्रतिनिधी/ संदेश मेश्राम
मा. श्री. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक गोंदिया यांचे मंजुरी आदेशाने व मा. श्री. अशोक बनकर, अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया कँप देवरी यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 17/08/2023 रोजी मा. श्री. संकेत देवळेकर., उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग देवरी, यांचे हस्ते सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव येथील विविध मंजूर कामांचे भुमीपुजन करण्यात आले. तसेच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत असलेल्या एकुण 63 प्रशिक्षणार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा विषयी सविस्तर शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि- सोमनाथ कदम, सपोनि. जोहेब शेख, सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव चे प्रभारी सपोनि सचिन घाटे, पोउपनि प्रताप बाजड, SRPF चे पोउपनि अटकरे, तसेच जि.पो. व SRPF चे अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Total Users : 883186
Total views : 6488654
