



प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
तुमसर: भारतीय जनता पक्षाच्या वतीने सब्जी मंडी तुमसर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी खासदार शिशुपालजी पटले यांचे शुभहस्ते ध्वजारोहण कऱण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्रदीपजी पडोळे,पंकज बालपांडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.ध्वजारोहना नंतर ध्वजवंदना व राष्ट्रगीत झाले.माजी खा.शिशुपाल पटले व माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून स्वातंत्र्य दिनाचे महत्व सांगितले.यावेळी माजी नगराध्यक्षा सौ.गीताताई कोंडेवार, तालुका अध्यक्ष कांशीराम तेंभरे,सुनील लांजेवार,आशिष कुकडे,योगेश रंगवणी,विजय जैस्वाल,कल्याणी भुरे, कुंदा वैद्य,प्रीती मलेवार,आदिती कालबांधे,हनुमंत मेटे,राजकुमार मरठे,अनिल रोचवणी,चंद्रशेखर भोयर,गजानन देशमुख,रमेश निखाडे, सुरेश थोटे, कृष्णा पाटील, सतीश मलेवार,शिशिर वैद्य,वसंत आगाशे, अर्चना भुरे,शिला डोये,सुरेश कापसे, लक्ष्मण भांडारकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन योगेश रंगवानी यांनी केले.