



प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
भंडारा ;- क्रांती दिनानिमित्त तसेच जागतिक आदिवासी दिवसाचे औचित्य साधून ओबीसी मोर्चा च्या स्थापना दिवस साजरा करीत सर्वप्रथम भंडारा शहरातील छोटा बाजार येथील क्रांतीकारी भगतसिंग यांच्या पुतळ्याला मारल्यावर पण अर्पण करून पुष्णाजली अर्पण करत शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्यानंतर ग्राम.पिपरी खैरी पुनर्वसन सालेबर्डी येथे लोकांची शाळा माध्यमिक व उच्च माध्यमिक पुनर्वसन पिपरी येथे शाळेत जाऊन विद्यार्थ्यांसोबत गावातून प्रभात फेरी काढत झाडे लावा झाडे जगवा नारा देत जनजागृती करण्यात आली
तसेच शाळेच्या आवारात आणि ग्रामपंचायत कार्यालय परिसरात ओबीसी क्रांती मोर्चाच्या स्थापना दिवसानिमित्ताने तब्बल 20 वेगवेगळ्या प्रजातीचे झाडे लावण्यात आले. नऊ ऑगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन संयुक्तरित्या साजरा करत भारत छोडो आंदोलनात ज्या वीरांनी प्राणाची आहुती दिली अशा नाभिक व अनामिक वीरांना आदरांजली अर्पण करत शाळेतील विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या मार्गदर्शनातून मार्मिक मार्गदर्शन करण्यात आले.तसेच ओबीसी क्रांती मोर्चा स्थापना करण्याचे उद्देश सांगण्यात आले.त्यांनतर विद्यार्थ्यांना रोजच्या मध्यांत भोजनात जलेबी देण्यात आली.या प्रसंगी सरपंच देविदास ठवकर,सौ.वाकडे मॅडम,मनोहर गाढवे तसेच शिक्षक शिक्षिका आणि ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते,महिलाध्यक्ष शोभा बावनकर,संयोजक जीवन भजनकर,यशवन्त सूर्यवंशी, सुधीर सर्वे,मीधून वंजारी,भाऊ कातोरे,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बंडू बोपचे,कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष युवराज वंजारी,धनु भेंडारकर,रमेश कुंभलकर,बालू वंजारी,निखिल वंजारी धनराज भेंडारकर,रामधन धकाते, वसंता साकोरे,गणेश शेंडे,युवराज वंजारी,बळीराम सेलोकर,हिमांशू बोंद्रे, संजय भरतकर,मारकर कुभरेकामेश शेंडे,बंडू वाडीभस्मे आदी ओबीसी क्रांती मोर्चा जिल्हा तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.