![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आलेल्या भंडारा येथील आरोग्य नर्सिंग स्कूलच्या 20 विद्यार्थिनी यांना परीक्षा देता यावी या मागणीसाठी भंडारा येथे उपोषण सुरू केले. या विद्यार्थ्यांच्या उपोषण मंडपाला भेट दिली. आम्हाला परीक्षा देता यावी, परीक्षेपासून वंचित ठेवू नये अशी मागणी या विद्यार्थ्यांची होती.
नर्सिंग बोर्डाकडे हा विषय असल्याने संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कुठल्याही परिस्थितीत शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही असा विश्वास विद्यार्थिनींना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून विद्यार्थिनींच्या मागण्यांच्या अनुषंगाने सकारात्मक तोडगा निघाव यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलन करीत असलेल्या विद्यार्थिनींशी संवाद साधून शासन आपल्या पाठीशी आहे असे सांगितले. यावेळी विद्यार्थिनींना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.