![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
लातूर जिल्हा प्रतिनिधी / राठोड रमेश पंडित
अहमदपूर:- अहमदपूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे धान्य वाटप केले जात असून ,तांदळाच्या कट्ट्यात अळ्या जाळ्या व किडे पीठ आढळून येत आहेत तसेच गव्हात खडे मातीचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून आले असून याच पद्धतीने गहू वाटप करण्यात येत आहे अशा धान्याच्या सेवनाने जर विषबाधा होऊन माणूस दगाऊ शकतो.राशनधारक नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्यास त्यास जबाबदार कोण हा प्रकार म्हणजे सरकारच जगतोय व सरकारच मारतोय अशातला असून अहमदपूर पुरवठा विभागातून धान्याची तपासणी न करता धान्य वितरित केले जात आहे यावर संबंधित दोषी असलेल्या पुरवठा विभागातील गोडाऊन किप्पर नायब तहसीलदार व त्यांना सहकार्य करणाऱ्या याचेवर रीतसर कारवाई करून तात्काळ निलंबित करावे व गोरगरीब सर्व सामान्य राशनधारका नागरिकांस न्याय मिळवून द्यावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी व तहसीलदार याना देण्यात आला आहे.
या निवेदनावर शहर प्रमुख शिवा कासले, उपशहर प्रमुख शिवकुमार बेद्रे, गणेश माने बाळासाहेब पडीले ,अजय सुरनर, जयपाल बार्शीकर, कैलास जाधव, जमीर शेख, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत