



सालेकसा तालुका प्रतिनिधी/ अशोक कटकवार
आज दिनांक 25/09/2023 रोज सोमवार ला ग्राम पंचायत सातगाव पं समिती सालेकसा जि गोंदिया येथे आझादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत मेरी माती मेरा देश मध्ये अमृत कलश यात्रेचे आयोजन ग्राम पंचायत सातगाव भवनातून सुरूवात करण्यात आली. यात प्रामुख्याने मा. श्री संतोषजी बोहरे उपसभापती प. स. सालेकसा उपस्थीत होते. तसेच मा. श्री नरेशजी कावरे सरपंच ग्रा प सातगाव, मा. सौ. अफरोजताई पठाण उपसरपंच ग्रां प सातगाव, मा. सौ. सुषमाताई काळे सदस्या ग्राम पंचायत सातगाव, मा. कु. सुमनताई ठाकरे सदस्या ग्राम पंचायत सातगाव, मा. सौ. श्वेताताई अग्रवाल सदस्या ग्राम पंचायत सातगाव, मा. श्री. मेश्राम सर मुख्याध्यापक जि. प. हाय. स्कूल साकरिटोला, मा. सौ. अजयाताई चुटे मुख्याध्यापिका श्री विद्या गर्ल्स हायस्कूल साकरीटोला, मा. श्री. नारायणजी काळे अध्यक्ष तंटा मुक्त समिती सातगाव, मा. श्री. ओ. के. रहांगडाले ग्रामसेवक ग्रा प सातगाव, सर्व शिक्षक, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी गावातील प्रतिष्ठित नागरिक, आंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम पंचायत कर्मचारी, विद्यार्थी व विद्ार्थिनी उपस्थीत होते.
मेरी माती मेरा देश हा अभियान एक महत्त्वपूर्ण नागरिक अभियान आहे जो भारतीय समाजाला एकता व देश प्रेमाची भावना जोडण्याचा प्रयत्न करतो याची जाणीव करून दिली w या अभियानांतर्गत संपूर्ण गावात अमृत कलश यात्रा काढण्यात आली. यामध्ये प्रत्येक घरून 01 मूठ माती गोळा करून अमृत कलश मध्ये घालण्यात आले. सदर कार्यक्रम ढोल ताशांच्या आवाजात काढण्यात आले. विद्यार्थ्यांनी मेरा देश मेरा घर, मेरी माती मेरा देश, माटी को नमन विरोंको वंदन, मेरी माती मेरा देश यही है एकता का संदेश, भारत माता की जय ! सारखे नारे लावून घोषणा केली. व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आले.