भारत या शब्दाला विरोध नाहीच,इंडिया या शब्दाला आताच विरोध का? सध्याच्या परिस्थितीत हा संपूर्ण प्रकार राजकीय प्रेरीत असल्याचे स्पष्ट दिसून येते.
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
भारत आणि इंडिया या दोन शब्दामुळे राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे.देशासाठी कोणता शब्द योग्य आहे हे देशवासीयांना राजकीय पुढाऱ्यांनी सांगण्याची गरज नाही त्यांना चांगल्याप्रकारे अवगत आहे.त्यामुळे जनतेनी भारत म्हणावे की इंडिया हे राजकीय पुढाऱ्यांनी जनतेला सांगु नये किंवा शिकवू नये.भारत-इंडिया या राजकीय वादात सर्वसामान्यांना गुरफटने म्हणजे स्वतंत्र भारताचा अपमानच म्हणावा लागेल.भारत भुमि हि प्राचीन भुमि आहे हे सुद्धा राजकीय पुढाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.भारतात ऋषी-मुनी,देवी-देवता,देव-दानव,साधु-संत,राजे-महाराजे,थोरमहात्मे, क्रांतिकारक, विचारवंत यांच्या आशीर्वादाने भारत भुमि सुसंस्कृत भुमि म्हणून जग प्रसिद्ध आहे.प्राचीन काळात भारताला जम्बूव्दिप या नावाने ओळखले जायचे, ऋग्वेदामध्ये भारतीय उपखंडाला आर्यावर्त असे म्हटले जायचे, जम्बूव्दिप या नावासोबत भारताला प्राचीन काळी भारतखंड म्हटलं जायचं, सध्या देशाला भारत हे नाव प्राचीन काळातल्या भरत राजावरून पडल्याचे सांगितले जाते, स्वतंत्रपुर्व काळात व मोगलांच्या काळात भारताला हिंदुस्थान म्हटले जायचे, ब्रिटिशांच्या काळात भारताला इंडिया म्हटलं जायचं अशा प्रकारे भारत विविध नावांनी जगप्रसिद्ध आहे.हेही तेवढेच सत्य आहे की ब्रिटिशांनी नेहमीच भारतभुमित जहर घोळण्याचे काम केले. त्यामुळेच आज भारत-इंडिया वाद निर्माण झाला आहे.परंतु सध्याच्या परिस्थितीत भारत-इंडिया वादंग फक्त राजकारणापोटी होत असल्याचे स्पष्ट दिसुन येते. सरकारला इंडिया नावाला विरोध असेल तर कायद्याच्या चाकोरीतून इंडिया शब्दाला हटवून भारत ठेवावे याचे सर्वच स्तरातून स्वागतच होईल.कारण संपूर्ण महत्वपूर्ण संस्थानाचे नावे बदलविण्याकरीता सरकारला सोईस्कर होईल.परंतु आता अचानक भारत-इंडिया याचा वाद टोकाला पोहोचल्याचे दिसून येते.भारताला स्वतंत्रपुर्व काळात हिंदुस्थान म्हणायचे त्याप्रमाणे हिंदुस्थानला भारत किंवा इंडिया सुध्दा म्हणतात.भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर भारत किंवा हिंदुस्थान हा शब्दप्रयोग व्हायचा.परंतु नंतर ब्रिटिश काळापासून इंडिया हाही शब्द जोडण्यात आला.देशात जर काही राजकीय पक्षांना इंडिया या शब्दाची घृणा वाटत आहे तर गेल्या 76 वर्षांत फक्त भारत हा एकच शब्द का वापरण्यात आला नाही? किंवा कायद्याच्या चाकोरीतून भारत या शब्दाकरीता प्रयत्न का केले नाही?भारत हिंदुस्तान हे पर्यायी शब्द आपल्या जवळ होते या दोन पैकी एका शब्दाचा वापर करून इंडिया या शब्दाला बाहेर करायला पाहिजे होते.आपण आता इंडिया या शब्दाचा विरोध करून काय साध्य करणार आहे.देशातील अनेक महत्वपूर्ण संस्थानाचे नाव इंडिया या शब्दानी जोडले जाते.ज्याप्रमाणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अशा अनेक महत्वपूर्ण शेकडो संस्थांचे नाव सरकार बदलविणार काय?नोटांवरील नाव बदलविनार काय?असे अनेक प्रश्न १४० कोटी जनतेच्या मनात आज भेडसावत आहेत. इंडिया या शब्दाचा विरोध फक्त विरोधकांच्या एकजुटीला विरोध म्हणून होत तर नाही ना?यात कोणतेही देश प्रेम असेलच असे मला वाटत नाही.आपण आजही भारत हा शब्द मोठ्या स्वाभिमानाने उच्चारतो आणि आकाश-पाताळ, सुर्य-चंद्र आहे तोपर्यंत भारत हा शब्द आपल्या हृदयात निरंतर राहील यात दुमत नाही.त्याचप्रमाणे हिंदुस्थान हाही शब्द मोठ्या ऐटीणे उच्चारतो मग आताच इंडिया या शब्दाला विरोध का? इंडिया हा शब्द प्रशासकीय असला तरी सर्वांच्या हृदयात आजही भारत -हिंदुस्थान हा शब्द घर करून आहे व राहील.परंतु इंडिया या शब्दाचा विरोध राजकीय दृष्ट्या होत असेल तर हीबाब लोकशाहीच्या दृष्टीने चुकीचे आहे.कारण विरोधकांनी एकत्र येऊन ज्याप्रमाणे इंडिया नाव ठेवले.जर इंडिया नाव न ठेवता भारत ठेवले असते तर सरकारने काय केले असते?हाही प्रश्न उद्भभवतो. विरोकांनी जेव्हा आपल्या पक्षाचे नाव इंडिया ठेवले तेव्हा निवडणूक आयोगाने किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कायद्याच्या चाकोरीतून इंडिया या शब्दाला विरोध का केला नाही? इंडिया-भारत-हिंदुस्तान या शब्दामध्ये भ्रम निर्माण करून सर्वसामान्यांमध्ये फालतुचा गैरसमज सरकारने पसरवू नये.आतापर्यंत सर्वच राष्ट्रपतींना प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणत.परंतु राष्ट्रपतींच्या जी-20 निमंत्रण पत्रिकेत “प्रेसिडेंट ऑफ भारत”असा उल्लेख केला आहे.ही सुध्दा आश्चर्य जनक बाब आहे.प्रेसिडेंट आणि ऑफ हा सुद्धा इंग्रजी शब्द आहे मग यात इंग्रजी शब्दांचा वापर का करण्यात यावा? असाही प्रश्न उपस्थित होतो.इंडिया शब्दाला धरून अनेक शब्द आपण उच्चारतो याप्रमाणे मेक इन, शायनिंग,स्टार्ट अप,खेलो,जीतेगा इंडिया अशा अनेक शब्दांसमोर आपण इंडिया लावून स्वाभिमानाने उच्चारतो. त्याचप्रमाणे इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स अशा अनेक महत्वपूर्ण ठिकाणी इंडिया शब्द आपल्याला दिसून येते.त्यामुळे माझ्यामते सरकारने इंडिया या विषयावर गहन चर्चा करून योग्य निर्णय घेतला पाहिजे.घाईगर्दीत निर्णय घेऊन सर्वसामान्यांना असमंजस्यमध्ये टाकू नये किंवा भ्रमित करू नये.सर्वच क्षेत्रात मुळ भारतीय शब्दांचा वापर केला तर ही बाब सोने पे सुहागा होईल असे मला वाटते.
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी, नागपूर)
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.