
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
भंडारा- भंडारा जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील, कृषी विभागातील व इतर विविध विभागाअंतर्गत होत असलेला गैरप्रकार तत्काळ थांबविण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा भारत राष्ट्र समिती पक्षाचे नेते माजी आमदार चरण वाघमारे यांनी पत्र परिषदेत दिला आहे.
सविस्तर माहिती अशी आहे की,
१) जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जवळपास दीडशे कोटीचे रस्त्याचे कामे मंजुर असुन निविदा प्रक्रियेत आहेत असे असताना निविदा प्रक्रियेत काही राजकीय सत्ताधारी पक्षाच्या नेत्याकडून कंत्राटदारावर दबाव टाकून कामात रिंग बनवून स्पर्धा करू नका अन्यथा पाहून घेऊ असा इशारा देण्यात आल्याची माहिती आहे. शासकीय दरापेक्षा कमी किंमतीत कामे व्हावे म्हणून ई- निविदा प्रक्रिया राबवली जाते. परंतु भंडारा जिल्ह्यात कंत्राटदारावर दबाव टाकून कामात स्पर्धा करू नका,निविदा भरल्या असल्यास परत घ्या.परत न घेतल्यास तुम्हाला त्रास होईल अशी धमकी कंत्राटदारांना दिल्या जात आहेत. याची माहिती मिळताच मी मुख्य अभियंता सा.बां.विभाग नागपूर तसेच,कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग भंडारा यांना लिखित तक्रारी केल्या आहेत. याकडे दुर्लक्ष झाल्यास आपण तीव्र आंदोलन करू, तसेच
२) कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झालेला असुन मानव विकास योजनेतुन जिल्ह्यातील तुमसर,मोहाडी, लाखनी, साकोली आणि लाखांदूर तालुक्यातील शेतकरी गट कंपनीला ट्रॅक्टर ,रोटावेटर व इतर यंत्रसामुग्री करिता लाभार्थी निवडीपासून साहित्य वाटपाच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून कोणत्याही वृत्तपत्रात जाहिरात न देता, कोणतीही निविदा न काढता, वेळेवर शेतकरी गट स्थापन करून आपल्या मर्जीतील लोकांना ट्रॅक्टर व इतर यांचा सामग्री वाटपाचे काम झाल्याचे व सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच ही निविदा काही विशिष्ट डीलरला देऊन जास्त किमती दाखवून, तुलनेने कमी साहित्याची खरेदी करून रेकॉर्डवर जास्त संख्या दाखवीत पेमेंट शेतकरी गटाला न करता पुरवठा धारकाला करणे. लाभार्थी हिस्सा जास्त घेणे. एका सत्ता पक्षाच्या राजकीय नेत्याच्या हस्तक्षेपामुळे लाभार्थी निवड करताना नियमानुसार लाभार्थी निवड न करता, नियमानुसार साहित्य खरेदी न करता, शासनाचे मानव विकास योजना अंतर्गत जवळपास 25 कोटी रुपयांच्या गैरप्रकार प्रकार झाला असल्याने, या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून कारवाई, नियमानुसार लाभार्थी यादी केली काय ? नियमानुसार साहित्य खरेदी केले काय ? कुठल्या पुरवठा धारकाला कंत्राट दिले साहित्य खरेदी आणि वाटपात शासनाचे मार्गदर्शक सूचनाचे पालन केले काय ? याबाबतची सविस्तर चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी आपण प्रकल्प संचालक आत्मा यांना केली आहे. वरील सर्व नियमबाह्य प्रक्रिया करताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भंडारा यांना प्रकल्प संचालक आत्मा यांच्या अतिरिक्त कार्यभार असताना झालेला आहे.
3) याप्रमाणे जिल्ह्यात वन विभागात, पाटबंधारे विभागाच्या तसेच नगरपरिषदेच्या कामात सुद्धा ई-निविदा प्रक्रियेत राजकीय दबावाच्या वापर करून गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक निविदा प्रक्रियेत मर्जीतल्या कंत्राटदाराला कामे मिळावीत म्हणून त्यांच्या सोयीनुसार निविदा प्रक्रियेत अटी घालून नियमबाह्य निविदा काढल्या असल्याचे समजते.
4) जिल्ह्यातील पोलीस विभागाच्या आशीर्वादाने घरफोडीचे प्रकरणात वाढ झाली असून गृह खात्याचे दुर्लक्ष आहे. स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे गृहमंत्री असून घरफोडी करणाऱ्या चोरांकडून पैसे घेऊन त्यांना मदत केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पाच दिवसांपूर्वी आंधळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कान्द्री येथे बाळकृष्ण उरकुंडे यांच्या दुकानातील ऑइलचे कॅन चोरीला गेले, ऑइल चोरीसाठी टवेरा गाडीचा वापर करण्यात आला, पोलिसांना तपासात माहिती मिळाली आणि मालकाकडून चाळीस हजार रुपये घेऊन गाडीवरील कार्यवाही थांबवीली आणि जप्तीनाम्यात मोटार सायकल दाखविली. टवेरा गाडी ज्यांची होती त्यांच्याकडून चाळीस हजार रुपये पोलिसांनी घेतले आणि गाडी सोडली याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली परंतु त्यांनी दखल घेतली नाही पोलिसच चोरांना मदत करीत असतील तर घटना नक्कीच वाढतील स्वतः राज्याचे गृहमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांचे या जिल्ह्यावर दुर्लक्ष असल्याने चोरीचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांच्या शेतावरच्या मोटारी चोरणाऱ्यांचे प्रमाण वाढले वाढण्याचे कारण काय ? चोराला वाचविण्यात पोलीस सहकार्य करीत असतील तर या जिल्ह्यात कोणी सुरक्षित राहू शकत नाही.
वरील सर्व प्रकरण लक्षात घेता पालकमंत्र्यांची या जिल्ह्याला वाऱ्यावर सोडले आहे त्यांच्या चेल्याचपाट्यांच्या हातात अधिकार दिले आहे.हे संविधानिक आहे का? जिल्ह्यामध्ये प्रमुख अधिकारी कठपुतली बनून काम करीत आहेत.कायदे बाजूला ठेवून सनदी अधिकारी काम करतात याचे अनेक उदाहरण पहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था विस्कळीत आहे, बांधकाम विभागातील,कृषी विभागातील, पाटबंधारे ,वन विभागातील ,तसेच नगरपरिषद मधील निविदा प्रक्रियेत गैरप्रकार न थांबविल्यास आपण तीव्र आंदोलन छेडू असा इशारा माजी आमदार चरण वाघमारे यांनी दिला.





Total Users : 883228
Total views : 6488698
