
(सकल धनगर जमातीची निवेदनाव्दारे सरकारकडे मागणी)
उपसंपादक / राठोड रमेश पंडित
लातूर/अहमदपूर: संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर जमातीचा घटनेप्रमाणे समाविष्ट असलेल्या अनुसूचित जमातीत एसटी प्रवर्गा मध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि तसा वटहुकूम काढावा अशी सकल धनगर जमातीच्या वतीने अहमदपूर तहसीलदारांना निवेदन देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार,देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे.सविस्तर बातमी अशी की भारताच्या संविधानात धनगर जमातीचा (एस टी)अनुसूचित जमाती मध्ये समावेश आहे तरी देखील पुरोगामी महाराष्ट्र सरकारच्या तथाकथित सरकारने लोकशाहीच्या साठ -सत्तर वर्षात देखील महाराष्ट्रातील धनगर जमातीची न्याय प्रविष्ठ मागासलेपणा असून देखील आजतागायत जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील धनगर जमातीस अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून व त्याच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे त्यामुळे धनगर जमातीत महाराष्ट्र सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.महाराष्ट्र सरकारने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातील धनगर जमात ही (एस टी)अनुसूचित जमातीत असले बाबत तात्काळ शिफारस करून महाराष्ट्रातील धनगर जमात बांधवांना न्याय मिळवून द्यावा अशी सकल धनगर जमात बांधवांच्या वतीने अहमदपूर तहसीलदार यांच्या कडे निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे त्या प्रसंगी बालाजी देवकते,बालाजी होळकर,लखन घोडके,गंगाराम पोले,पांडुरंग लोकरे,परमेश्वर पोले, नरवटे संग्राम आनंद होळकर, गोविंद बैकरे, रोकडोबा भूसाळे आणि इतर सर्व धनगर जमात बांधव उपस्थित होते.





Total Users : 883068
Total views : 6488500
