
अहमदपूर प्रतिनिधी/ विष्णु मोहन पोले
लातूर/अहमदपूर: महाराष्ट्रामध्ये आता मराठा आरक्षण आंदोलनानंतर आता धनगर समाजाने पण आम्हाला राज्यघटनेने आरक्षण दिलेले आहे परंतु राज्य सरकारने आमची अंमलबजावणी केली नाही राज्य सरकारने आमची एस टी आरक्षणासंदर्भातली अंमलबजावणी करावी यासाठी कंबर कसल्याचे पहावयास मिळते आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी येथे काही धनगर समाज बांधव आमरण उपोषणासाठी बसले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर धनगर समाज बांधवांच्या बैठक होत आहेत तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या शेखर बंगाळे या धनगर समाज बांधवांनी विखे पाटलांच्या अंगावर भंडारा उधळला म्हणून विखे पाटलाचे सुरक्षारक्षक आणि तेथील विखे पाटलांचे समर्थक असलेले भाजपाचे पदाधिकारी यांनी शेखर बंगाळे यांना मारहाण केली.शेखर बंगळे यांनी केलेल्या या कृत्याचे समर्थन करत माजी खासदार विकास महात्मे म्हणाले की,भंडारा हा आमचा उत्सवाचं प्रतीक आहे आणि ज्या काही त्या तरुणाने दिलेल्या घोषणा आहेत तो या राजकीय लोकांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून त्या तरुणाचा रोष त्या तरुणाने व्यक्त केला आहे भंडारा उधळणे यामध्ये गैर काय आहे ? राजकीय पुढाऱ्यांना निवडणुकीच्या वेळी धनगराची घोंगडी आणि काठी चालते पण पण आता भंडारा अंगावर उधळल्यामुळे झालेली मारहाण धनगर समाजाच्या खूप जिव्हारी लागलेली आहे असं धनगर समाज बांधव आपल्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगत आहेत खरं तर सोशल मीडियामध्ये विखे पाटलांना भरपूर प्रमाणामध्ये ट्रोल केलं जात आहे आणि त्यांच्या सुरक्षारक्षक आणि पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. नगर जिल्ह्यामध्ये बहुसंख्याने धनगर समाज आहे विखे पाटील निवडणुकीच्या सभांमध्ये घोंगडी आणि काठी घेऊन उभे असलेले फोटो अनेक आहेत आजच्या या कृत्यामुळे हे लक्षात येते की धनगर समाज आणि त्या समाजाचा असलेलं उत्सवाचं प्रतीक भंडारा याच्याबद्दल विखे पाटलांचे बेगडी प्रेम आहे. याच्या अगोदर पण अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यासाठी सुद्धा विखे पाटलांचा विरोध होता म्हणजे याचाच अर्थ असा आहे की विखे पाटलांच्या मनामध्ये धनगराबद्दल द्वेष आहे का?
विखे पाटील यांनी फक्त एकट्या सोलापूर जिल्ह्यातील एक तरुणाचा अपमान केला नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अपमान केला आहे आणि त्यांनी त्याची धनगर समाजाकडे जाहीर माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्रामध्ये जोर धरत आहे. ज्या पक्षांमध्ये पाटील आहे त्यात पक्षाचे धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी पण भंडारा उधळणे हे काय वाईट कृत्य नाही तर तो खंडोबाचा आशीर्वाद समजून भंडारा लावून घ्या हे आपलं मत मांडताना सांगितलेला आहे. बिरोबाच्या पाया पडायला जाणारे देवेंद्र फडणवीस साहेब हे सध्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत त्याच बिरोबाचं प्रतीक मानला जाणारा भंडारा लावला म्हणून जर एका कार्यकर्त्याला मारहाण होत असेल तर त्यावर गृहमंत्री म्हणून ते संबंधित मंत्री आणि त्यांच्या सुरक्षारक्षक, पदाधिकारी यांच्यवर गुन्हा दाखल करतील का? धनगर समाज बांधव आपला रोष व्यक्त करताना म्हणत आहेत की जर विखे पाटलांना निवडणुकीमध्ये आमची काठी आणि घोंगडं चालतं तर आता भंडाऱ्याची ऍलर्जी झाली का?





Total Users : 883090
Total views : 6488524
