
तुमसर ,पाश्चत्य संस्कृति चे अंधानुकरण करण्या ऐवजी वृक्षरोपण करून पर्यावरण संरक्षण करण्याचा आदर्श संदेश साई शिक्षण संस्था चे अध्यक्ष मा.श्री.किशोर चौधरी यांनी दिला. निसर्गाच्या सानिध्यात वाढदिवसानिमित्त चौधरी शिक्षण परिसर मांगली, तुमसर येथे १०० वृक्षाचे रोपण करून लायन्स क्लब तुमसर ललितम चे संस्थापक अध्यक्ष डॉ. किशोर चौधरी यांनी आपला वाढदिवसानिमित्त मित्रमंडळी सोबत साजरा केला.
निसर्ग मानवाला खूप काही देत असतो .याची जाण ठेवून निसर्गा चे ऋण देणे आहे,या कृतज्ञता च्या भावनेतुन पर्यावरण चे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने आप आपल्या घरी, रास्त्याचा कडेला, आपल्या परिसरात किमान एक तरी झाड लावावे असे आवाहन या प्रसंगी डॉ. किशोर चौधरी यांनी केले.
या वेळी लायन्स क्लब तुमसर ललितम चे पदाधिकारी पंकज भुते, अरुण(टाटा) लांजेवार, सीताराम जोशी वल्लभ,अशोक कुकड़े, नरेश कुंभलकर,संदीप पेठे, प्रदीप अग्रवाल, दीपक कावड़े, संजय बुराडे, ललित कुमार थानथराटे,आसाराम सिंगनजुड़े, नामदेव भुते, सचिन बड़वाईक, प्रताप पटले, विजय चिंधालोरे, प्राचार्य संदीप चामट, प्राचार्य देवेन्द्र रंभाड़, जीवन वनवे ,राकेश मलाधरे, प्रा.हेमलता लांजेवार, प्रा.पप्पू राऊत, प्रा.ज्योती टेकाम , प्रा. आभा सिंगनजुडे ,प्रा.श्रुती मेश्राम, प्रा.आम्रपाली डोंगरे, प्रा .प्रिया गोधूळे ,प्रा.शुभम बावणे, प्रा.सेलोकर सर, गुलशन बुदे, विक्की मानवटकर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदि प्रामुख्याने उपस्थित होते .





Total Users : 883234
Total views : 6488705
