![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
सालेकसा तालुका प्रतिनिधी/ अशोक कटकवार
गडचिरोली:- महिला आघाडी मोर्चा च्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांचा दि.१३ सप्टेंबर २०२३ ला गडचिरोली येथे जिल्हा दौऱ्याप्रसंगी येत असुन त्या करिता नियोजित कार्यक्रम करण्याकरिता शासकीय विश्रामगृह कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे नियोजन बैठक घेण्यात आली.या बैठकीचे अध्यक्ष खासदार अशोकजी नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संपन्न झाली.त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम घर चलो अभियान,मेरी माटी मेरा देश,सामाजिक कार्यात काम करणारे प्रतिभावंत व्यक्तीच्या भेटीगाटि,सरलॲप डाऊनलोड व भाजपा महिला कार्यकर्ता मेळावा असे अनेक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील असंख्य महिला भगिनींनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार अशोकजी नेते यांनी अध्यक्षीय समारोप करतांना केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, महिला प्रदेश चिटणीस रेखाताई डोळस,लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे,प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चाचे प्रकाश गेडाम,युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्नील वरघंटे,महिला प्र.जिल्हा अध्यक्ष योगीता पिपरे,शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,नगरसेवक आशिष पिपरे,महिला जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके,शहराध्यक्ष कविता उरकुडे,जिल्हा सचिव गिताताई हिंगे,जेष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी,तसेच मोठ्या संख्येने महिला भाजपा पदाधिकारी उपस्थितीत होते.